agricultural news in marathi, cowdung bricket forming machine , Agrowon, Maharashtra | Agrowon

पेरा शेणखताच्या ब्रिकेट्स...
अमित गद्रे
सोमवार, 11 जून 2018

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक यांनी गेल्या सात वर्षांच्या प्रयोगातून शेणखताच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. शेणखताच्या ब्रिकेट्स बियाण्यासोबत कशा पेरता येतील याबाबत स्वतःच्या शेतीत प्रयोग केले. त्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक यांनी गेल्या सात वर्षांच्या प्रयोगातून शेणखताच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. शेणखताच्या ब्रिकेट्स बियाण्यासोबत कशा पेरता येतील याबाबत स्वतःच्या शेतीत प्रयोग केले. त्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे.

गेल्या काही वर्षांत जमिनीची सुपीकता कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला पुरेसे शेणखतही मिळत नाही. पावसाळ्याच्या अगोदर शेतात शेणखताचे ढीग लावून मजुरांतर्फे खत विस्कटले जाते. उष्ण तापमानामुळे शेणखतातील ओलावा उडून जातो. जोरदार वळीव पाऊस झाल्यास काही शेणखत वाहून जाते. यावर बरेच तज्ज्ञ आणि शेतकरी उपाय शोधत आहेत. यापैकीच एक आहेत मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक. कमी झालेली शेणखताची उपलब्धता आणि वाढता दर, मजुरी लक्षात घेता त्यांनी शेणखताच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. या यंत्राची त्यांनी पेटंटसाठी नोंदणी केली आहे.

असे आहे यंत्र :

  • ब्रिकेट तयार करण्याचे मिश्रण भरण्यासाठी नऊ इंच व्यास आणि नऊ इंच उंचीचा गोलाकार ड्रम. त्याच्या तळाला छिद्रे असलेली प्लेट. ड्रमच्या दोन्ही बाजूला दोन स्टॅन्ड आहेत. ड्रमवर दोन चॅनेलमध्ये चार स्प्रिंग.
  • ड्रममध्ये शेण आणि घटकांचे सहा किलो ओलसर मिश्रण भरल्यानंतर त्यावर प्लेट बसविली जाते. ड्रममधील मिश्रणावर दाब देण्यासाठी जॅक आहे. जॅक वर चढताना प्लेटवर दाब पडतो आणि ड्रममधील मिश्रण छिद्राच्या प्लेटमधून ब्रिकेटच्या स्वरूपात खाली पडते. जॅकला लॉक बसविलेले असते. लॉक खोलले की जॅकमधील दाब निघून तो मूळ स्थितीत येतो. त्यानंतर पुन्हा ड्रममध्ये मिश्रण भरता येते.
  • एका तासामध्ये ५० किलो ब्रिकेट. या ब्रिकेट दोन दिवस उन्हात वाळल्यावर २० ते २५ किलो होतात.
  • ब्रिकेट तयार करण्यासाठी वैभव मोडक वाळलेले शेण पावडर ६० किलो, १० किलो लेंडी खत, १० किलो कोंबडी खत, ५ किलो निंबोळी पेंड, ५ किलो वाया जाणारे धान्य (मोड आणून पेस्ट करावी), १० किलो गोठ्यातील शेणमूत्र मिश्रित माती हे मिश्रण वापरतात. पाच दिवस दररोज पाणी मिसळून हे मिश्रण चांगले मळले जाते. ब्रिकेट तयार करण्यापुर्वी हे मिश्रण चांगले मळून थोडे ओलसर असताना ड्रममध्ये भरतात.
  • बियाण्यासोबत ब्रिकेट पेरणीसाठी मोडक यांनी मोठे छिद्रे असलेले चाढे तयार केले. हे चाढे कोणत्याही तिफणीला बसविता येते. ब्रिकेट तिफणीच्या मागील बाजूने पडाव्या लागतात. कारण फणाची छिद्रे मोठी करता येत नाहीत. यासाठी तिफणीच्या मागील बाजूने प्रत्येक फणामागे ‘U` आकाराची लोखंडी क्लिप वेल्डिंग करावी. त्यामुळे ब्रिकेट पेरणीच्या चाढ्याचा मोठा पाइप त्यात बसतो आणि ब्रिकेट बियाण्यासोबत जमिनीत गाडली जाते.

ब्रिकेट वापरण्याचे अनुभव
शेणखत ब्रिकेट वापरण्याच्या अनुभवाबाबत मोडक म्हणाले की, एकरी सरासरी दोन टन शेणखत मिसळले जाते. परंतू १८ इंची तिफणीने पेरणी करताना एकरी १३९ ओळी बसतात. त्या ओळीमध्ये बियाण्यासोबत २०० किलो शेणखत ब्रिकेट पुरेशा ठरतात. १८ इंची तिफणीने पेरणी करताना चार इंच रुंदीचा रूट झोन तयार होतो. ब्रिकेट या रूट झोनमध्ये पडल्याने रोपवाढीस फायदा होतो. शेतकरी एकरी सरासरी पाच हजाराचे शेणखत वापरतो. परंतू शेणखताच्या ब्रिकेट्स तिफणीने पेरल्याने मला शेणखताचा ५०० रुपये खर्च येतो. पेरणीपूर्वी वाळलेल्या ब्रिकेटवर माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जिवाणू संवर्धकाच्या द्रावणाची फवारणी केल्यामुळे हे घटक थेट मुळांना उपलब्ध होण्यास मदत होते.  
गेली सात वर्षे मी ब्रिकेट्सचा वापर करत आहे. दरवर्षी ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा पिकासाठी ब्रिकेट्स वापरतो. ब्रिकेट्समुळे शेणखत खरेदीचा खर्च कमी झाला. पिकाला योग्य अन्नद्रव्ये मिळतात. किमान पाच ते दहा टक्यांपर्यंत उत्पादनात वाढ मिळाली. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. ब्रिकेटमुळे ओलावा टिकून रहातो. पावसाच्या ताणाच्या काळात मुळांना ओलावा आणि अन्नद्रव्ये मिळतात. मी आता रासायनिक खतांचा वापर करत नाही. यंत्र बनविण्यासाठी पाच हजाराचा खर्च आला. यंत्रामध्ये अजून सुधारणा करणार आहे. हे यंत्र आयआयटी,मुंबई आणि गुजरातमधील सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी संस्थेच्या तज्ज्ञांना दाखविले आहे.

संपर्क : वैभव मोडक : ९४२०९१६८५८

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...