agricultural news in marathi, crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

कृषी सल्ला
डॉ. यू. एन. आळसे, डॉ. व्ही. एस. पुरी
शनिवार, 24 मार्च 2018

धान्य साठवण :

धान्य साठवण :

  • मळणीनंतर धान्याची साठवण करताना त्यात ओलावा असणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी तयार केलेले धान्य प्रथम स्वच्छ करून ३-४ दिवस खळ्यावर कडक उन्हात वाळवून मगच साठवावे.
  • साठवण केल्या जाणाऱ्या धान्यात ओलावा असल्यास धान्याची उगवणशक्ती कमी होते. धान्याची प्रत ढासळते. धान्याचे गुणधर्म नष्ट होतात. तसेच कीडी व बुरशीपासून नुकसान होण्याची शक्यता वाढते.
  • उंदीर तसेच कीटकापासून नुकसान टाळण्यासाठी शक्यतो पत्र्याच्या सुधारित कणग्यांचा वापर करावा. त्या पूर्णपणे हवाबंद असल्यामुळे धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी असते.
  • धान्यात प्रामुख्याने टोके, सोंडे, छोटे भुंगेरे, खापरा, पिठातील तांबडे भुंगेरे, दातेरी कडाचे भुंगेरे या कीडी आढळतात.
  • धान्याची साठवण करण्यापूर्वी खोलीच्या भिंती व तळाची साफसफाई करून घ्यावी. भिंतीला असलेल्या चिरा बुजवून घ्याव्यात.
  • कणग्या/कोठ्या तसेच रिकामी पोती स्वच्छ करुन घ्यावीत. कारण त्यामध्ये जिवंत किडी असतात.
  • धान्य साठविल्यानंतर लागलेल्या किडीचे नियंत्रण फक्त धुरीजन्य किटकनाशकांद्वारे पासून करावे लागते.

चारापिकाचे व्यवस्थापन :

  • दुभत्या जनावरांना वर्षभर समतोल चारा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. समतोल आहार व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकदल व द्विदल अशी संमिश्र चारा पिके घ्यावीत. एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मे निम्मे असावेत.
  • भरपूर व उत्कृष्ट प्रतीचा चारा सातत्याने मिळण्यासाठी धान्य पिकाप्रमाणे चारा पीक लागवडीचे नियोजन करावे. त्यासाठी योग्य चारा पिकाची निवड, जमिनीची निवड, शेताची मशागत, योग्य वाणांची निवड, खतपाणी व्यवस्थापन आदी गोष्टी विचारात घ्याव्यात.

संपर्क :  डॉ. यू. एन. आळसे, ७५८८०८२१३७
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर चारा पिके
सकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेलबाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो....
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
मुरघास कसा तयार करावा ?मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...
पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
योग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...
लसूणघास लागवड कशी करावी?लसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये...
चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीरमका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका...
बरसीम चारा पिकाची लागवडबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा...
लुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान लुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीमबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५...
ओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे...
संकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञानसंकरित नेपिअर हे बहुवार्षिक, भरपूर व चांगले...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
पौष्टिक, लुसलुशीत चाऱ्यासाठी पेरा ओटओट पिकाचा पाला हिरवागार, पौष्टिक व लुसलुशीत असतो...
रुचकर, पाचक चारापीक ः गुणवंतराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...