ज्वारी, करडई, सूर्यफूल, कापूस पीक सल्ला

सुर्यफुलावरील केसाळ अळी
सुर्यफुलावरील केसाळ अळी

रब्बी ज्वारी : खोडकिडा : (पोंगेमर)

  • लक्षणे : मादी पिकावर अंडी घालते. त्यातून निघालेली अळी पानात शिरून त्यावर उपजीविका करते. त्यामुळे पानांवर एका रेषेत छिद्रे पडलेली दिसतात.
  • नुकसान : प्रादुर्भाव वाढल्यास अळी पोंगा खाऊन फस्त करते. परिणामी पीक मरते.
  • फवारणी : प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस २ मि.लि.
  • फवारणीचे ठिकाण : पोंगा
  • करडई : उगवणीनंतर आठवडाभरात विरळणी करावी. त्यासाठी दोन झाडातील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करावी. मावा नियंत्रण

  • लक्षणे : पिले व प्रौढ पाने, फुले आदींवर उपजीविका करतात. किडीने सोडलेल्या काळ्या चिकट पदार्थावर बुरशी वाढते.
  • नुकसान : प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. पिकाची वाढ खुंटते. उत्पादन घटते.
  • फवारणी : प्रतिलिटर पाणी डायमेथोएट १.३ मि.लि. किंवा अॅसिफेट (७५ टक्के) १.३ ग्रॅम
  • सूर्यफूल : खरीप पीक सूर्यफुलाच्या कणसातील अळ्या गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकाव्यात. पीक फुलोऱ्यात असल्यास कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये. केसाळ अळी नियंत्रण

  • लक्षणे : अळी प्रथम खालील बाजूने पाने (विशेषत: पानांतील हरितद्रव्य) खाते. प्रादुर्भाव वाढल्यास पानाचा केवळ सांगाडा शिल्लक राहतो.
  • नुकसान : तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. पीक मरते.
  • फवारणी : प्रति लिटर पाणी सायपरमेथ्रीन (१० टक्के) १ मि.लि. किंवा डायक्‍लोरव्हॉस (७६ टक्के) १.२ मि.लि.
  • सूचना : फवारणीचे द्रावण फुलावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रब्बी पीक : पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी प्रतिहेक्‍टरी ३० किलो नत्र द्यावे. बोंडे लागण्याची अवस्था (पेरणीनंतर ३०-४० दिवस), फुले उमलण्याची अवस्था (५५-६० दिवस) दाणे भरताना (६५-८० दिवस) पाणी द्यावे.

    तूर : पाण्याची सोय असल्यास संरक्षित पाणी द्यावे. पीक कळी आणि फुलोऱ्यात असताना पाणी दिल्याने उत्पादनात वाढ होते. शक्‍य असल्यास पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात. वांझ रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.

    कापूस : शक्‍यतो कापसाचा खोडवा घेऊ नये. डिसेंबरपूर्वी वेचणी पूर्ण करावी. पिकांचा पालापाचोळा, पऱ्हाट्या यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी. लाल्या विकृती :

  • लक्षणे : पाने लाल होतात. प्रथम कडेने व नंतर आतल्या बाजूने पानांचा रंग निघून जातो. प्रादुर्भावग्रस्त पान गुंडाळले जाते.
  • नुकसान : प्रादुर्भाव वाढल्यास पाने गळतात. बोंडगळ होते.
  • नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी - कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २.५ ग्रॅम अधिक  स्ट्रेप्टोमायसीन ०.१५ ग्रॅम अधिक युरिया २० ग्रॅम अधिक मॅग्नेशियम सल्फेट २ ग्रॅम
  • दहिया रोग : लक्षणे : जुन्या पानांवर वेगवेगळ्या आकारांचे पारदर्शक ठिपके दिसतात. शक्‍यतो हे ठिपके पानाच्या खालील बाजूस दिसतात. नुकसान : तीव्रता वाढल्यास पाने पिवळसर लाल होतात. पक्वतेआधीच गळून पडतात. फवारणी प्रतिलिटर, विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम

    संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com