लागवड जिरायती गव्हाची...

पंचवटी जातीचे गव्हाचे पीक
पंचवटी जातीचे गव्हाचे पीक

जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. लागवडीसाठी नेत्रावती आणि पंचवटी या जाती निवडाव्यात. लागवड दक्षिणोत्तर करावी. लागवड उभी-आडवी न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते.

गव्हाच्या विशिष्ट वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित गहू उत्पादन मिळविणे शक्‍य आहे. जिरायती जमिनीत गव्हाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १ मीटर खोलीपर्यंत वाढतात. त्यामुळे योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असावी. मशागत करताना शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्‍टरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. जिरायती लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बियाणे : प्रति हेक्‍टरी - ७५ ते १०० किलो बीजप्रक्रिया : कॅप्टन किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे पेरणीचे तंत्र - जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत २२.५ सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी दक्षिणोत्तर करावी. गव्हाची पेरणी उभी - आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते. पाणी व्यवस्थापन :

  • एकच पाणी देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
  • दोन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
  • तीन पाणी देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
  • टीप : गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.

    आंतरमशागत :

  • गव्हात जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी.
  • कोळपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
  • सुधारित जाती
    क्र.      जाती     पेरणीची परिस्थिती  प्रथिनांचे प्रमाण    वैशिष्ट्ये     उत्पादन क्षमता[क्विंटल/हेक्टर]
    १.   नेत्रावती(एनआयएडब्ल्यू :१४१५)    जिरायत किंवा मर्यादित सिंचनाखाली पेरणी   १२ टक्क्यांपेक्षा अधिक    तांबेरा रोगास प्रतिकारक,जिरायत क्षेत्रात १०५-११० व मर्यादित सिंचनाखाली ११०-११५ दिवसात कापणीस तयार होतो.     जिरायत १८ मर्यादित सिंचन ः २५ ते २७
    २.   पंचवटी (एनआयडीडब्ल्यू : १५)   जिरायत पेरणी   १२ टक्के     दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा,शेवया,कुरडयासाठी उत्तम, पिक १०५ दिवसात कापणीस तयार होते.  १२ ते १५
    खतमात्रा
    खतमात्रा खतमात्रा   खतमात्रा
    पेरणीची वेळ   नत्र (किलो/हेक्टर)    स्फुरद (किलो /हेक्टर)
    जिरायत पेरणी  ४०  २०
    टीप : जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. टीप : जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. टीप : जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.

    संपर्क :  डॉ. अविनाश गोसावी ७५८८००५९०५ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि.नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com