agricultural news in marathi, cure of hailfrost damaged crops , Agrowon, Maharashtra | Agrowon

गारपीटग्रस्त पिकांचे भावी नुकसान टाळा
डॉ. विलास खर्चे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा विदर्भाला तडाखा बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता पिकांमध्ये सुधारणा होण्यासाठी, तसेच भावी काळातील कामांवर परिणाम होऊ नये यासाठी त्वरित काही उपाययोजना कराव्यात.

गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा विदर्भाला तडाखा बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता पिकांमध्ये सुधारणा होण्यासाठी, तसेच भावी काळातील कामांवर परिणाम होऊ नये यासाठी त्वरित काही उपाययोजना कराव्यात.

  • सर्वप्रथम शेतात साठलेले पाणी निचरा करून शेताबाहेर काढून टाकावे.
  • मळणी व काढणी झालेली असल्यास पीक ताडपत्रीने झाकून ठेवावे.
  • फळबागांमध्ये गारपिटीचे अधिक नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे तुटलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. फळांना इजा झाली असल्यास जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कॉपरऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
  • फळपिकांमध्ये फांद्या, खोडे आदी ज्या ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसून इजा झाली आहे, अशा ठिकाणी १० टक्के बोर्डाे पेस्ट लावावी.
  • गारपिटीच्या तडाखा बसलेल्या ठिकाणच्या पेशी मृत झालेल्या असतात. त्यामुळे पेशींपासून बनलेल्या उतींची काही प्रमाणात हानी झालेली असते. त्यामुळे पेशीनिर्मिती वाढून उतींची वाढ पूर्ववत व्हावी यासाठी झाडावर बोरीक अॅसिड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • गहू, हरभरा आदी पिकांत साचलेले पाणी काढून टाकावे.
  • भाजीपाला पिके वाढीच्या प्राथमिक अवस्थेत असल्यास त्यांची वाढ पूर्ववत सुरू राहावी यासाठी युरिया १ टक्के (१० ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
  • हवामान खात्याने आगामी दोन दिवसांतही गारपीट व अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांत ज्या ठिकाणी फळे काढणीला आली असतील, ती त्वरित काढावीत. म्हणजे पुढील नुकसान टाळता येईल.
  • गारपिटीच्या तडाख्यामुळे फळबागांमध्ये आगामी काळात होणारी फूल व फळधारणा बाधित होऊ नये, यासाठी झाडांवर पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारणी करावी.

संपर्क : डॉ. विलास खर्चे, ८२७५०१३९४०
(संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...