तांबे, बोरॉन, मॉलीब्डेनमच्या कमतरतेची लक्षणे

डाळिंब, फुलकोबीमधील बोरॉन कमतरतेची लक्षणे
डाळिंब, फुलकोबीमधील बोरॉन कमतरतेची लक्षणे

पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती जमिनीतून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी, सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यातील तांबे, बोरॉन, मॉलीब्डेनम आणि क्लोरीन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची माहिती घेऊ. मॉलीब्डेनम जमिनीचा सामू जसा वाढतो तसतसे उपलब्ध मॉलीब्डेनमचे प्रमाण वाढते. याउलट जमिनीचा सामू जसजसा कमी होतो, तसतशी मॉलीब्डेनमची कमतरता वाढते. मॉलीब्डेनमयुक्त खते वापरून या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढता येते.

मॉलीब्डेनमयुक्त खते अमोनियम मॉलीब्डेनम (५४.० टक्के मॉलीब्डेनम), सोडीयम मॉलीब्डेनम (३९-४१ टक्के मॉलीब्डेनम) आणि मॉलीब्डेनम ॲसिड (४७.५ टक्के ).

वापरण्याची पद्धत या खतांची मात्रा अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताच्या तुलनेत अतिशय कमी लागते. त्यामुळे मॉलीब्डेनमयुक्त खते फवारणीतून दिली जातात किंवा मॉलीब्डेनमची बीजप्रक्रिया करून नंतर पेरणी करतात.

वनस्पतीतील कार्य

  • द्विदल धान्यामध्ये नत्रीकरणाचा वेग वाढविण्यास हे सूक्ष्मअन्नद्रव्य मदत करते. मॉलीब्डेनम उपस्थितीमध्ये नत्रस्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जंतूची क्रियाशीलता वाढते. पिकांमध्ये मॉलीब्डेनमची कमतरता असेल तर प्रथिनांचे संक्रमण योग्यरीत्या होत नाही. प्रथिन संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पिकांमधील नायट्रेटयुक्त नत्राचे प्रमाण वाढते. नायट्रेटीकरण करणाऱ्या विकराच्या निर्मितीसाठी मॉलीब्डेनम हा आवश्यक घटक आहे. पिकामधील प्रकाश-संश्लेषण आणि श्वासोच्छवास क्रियांवर मॉलीब्डेनम नियंत्रण ठेवते.
  • कमतरतेची लक्षणे पिकाची नत्रशोषण शक्ती मॉलीब्डेनमच्या कमतरतेमुळे कमी होते. परिणामी पिके पिवळी पडतात. मॉलीब्डेनम कमतरतेमुळे फुलकोबीच्या पानाच्या सर्व बाजूला गेरवा रंग येऊन पाने कोरडी पडतात. पानातील कोश अस्ताव्यस्त होतात. पानातील मधील मोठी शीर कायम राहून अन्य पाने वेडवाकडी किंवा नागमोडी होतात. ते चुरमूडल्यासारखे दिसते. याला ‘व्हिपटेल’ रोग म्हटले जाते. फुले-फळे गळायला लागतात. पुष्कळदा दाणे आणि फळेसुद्धा भरत नाहीत. तांबे मातीपरीक्षणानुसार उपलब्ध तांब्याची कमतरता व्यापक स्वरूपात आढळत नाही. मात्र, तांबड्या-लाल, हलक्या आणि उथळ जमिनीमध्ये तांब्याची कमतरता जाणवते. तांबे हे जडधातुयुक्त अन्नद्रव्य आहे. एकदा मात्रा दिल्यावर पुढील २ ते ३ वर्षे त्याचे पिकांवर शेष परिणाम दिसतात.

    उत्तम प्रतिसाद देणारी पिके मुळा, कांदा, गहू वापर पद्धती कॉपर सल्फेट (CuSo4, 5H2O=25 टक्के तांबे) आणि कॉपर अमोनियम सल्फेट (३० टक्के तांबे) ही तांबेयुक्त खते आहेत. जमिनीतून कॉपर  सल्फेटच्या स्वरूपात १० किलो प्रतिहेक्टरी द्यावे अथवा ०.२ ते ०.५ टक्के कॉपर  सल्फेट या द्रावणाची फवारणी करावी. वनस्पतीतील कार्य   पिकाच्या जीवनचक्रात कार्यरत असलेल्या विकरांचा तांबे हे एक मुख्य घटक आहे. ॲस्कॉर्बिक ॲसिड ऑक्सिडेज, टायरोसिनेज हे तांबेयुक्त विकर आहेत. नत्र आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण समतोल ठेवण्याचे कार्य तांब्याच्या उपस्थितीने होते. दवबिंदू आणि थंडीपासून बचाव करण्याची पिकाची शक्ती तांब्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. क्लोरोप्लास्टमधील  प्रकाश संश्लेषणाच्या विविध क्रियांमध्ये तांब्याची गरज असते. थोडक्यात, तांबे हे अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्य क्रियेत नियंत्रकाचे कार्य करते. कमतरतेची लक्षणे तांबे कमतरतेची लक्षणे प्रथम पिकांच्या वाढबिंदूवर दिसतात. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये डायबॅक (मर) रोग होतो. कांदा व भाजीवर्गीय पिकांमध्ये करपा रोग होतो. बोरॉन हलक्या, वालुकामय, उथळ, तांबड्या लॅटराइड जमिनीमध्ये उपलब्ध बोरॉनची कमतरता अधिक प्रमाणात भासते. अशा बोरॉन कमतरता असलेल्या जमिनीत बोरॉनयुक्त खतांचा वापर पिकवाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. बोरॉनयुक्त खते   बोरॅक्स ( ११.३ टक्के बोरॉन), सोडियम पेंटाबोरेट (१८.०टक्के बोरॉन), सोल्यूबोर (२० टक्के बोरॉन) वापरण्याचे प्रमाण जमिनीत बोरॉन कमतरता असल्यास बोरॉनयुक्त खत ५ ते १० किलो प्रतिहेक्टरी द्यावे. चांगला प्रतिसाद देणारी पिके अल्फा-अल्फा, फुलकोबी, शुगरबीट, भुईमूग, कापूस. वनस्पतीतील कार्ये बोरॉन हे अन्नद्रव्य पिकांच्या पुनरुत्पादन क्रियेत भाग घेते. पिकांच्या फुलावरील स्रीकेसरामध्ये बोरॉन जमा होतो. सर्वसाधारण परागकणांच्या परागनलिकेतून प्रवासासाठी बोरॉनची गरज असते. कोश विभाजनाच्या प्रक्रियेकरिता बोरॉनची गरज असते. पिष्टमय पदार्थ निर्मितीचे काही टप्पे बोरॉनच्या उपलब्धतेनुसार नियंत्रित होतात. बोरॉनच्या कमतरतेमुळे संपूर्ण शर्करा  आणि स्टार्चचे प्रमाण वाढते. संपूर्ण  शर्कराचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होत नाही. पिष्टमय पदार्थाच्या वहनास बोरॉनच्या अस्तित्वामुळे चालना मिळते. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांवर निर्माण होणारा ताण सहनशीलता वाढवण्यास बोरॉनची मदत होते. कमतरतेची लक्षणे कमतरता असलेल्या पिकांमध्ये द्रव्य नत्राचे प्रमाण अधिक असते. बोरॉनची हालचाल आणि वाहकता कमी असल्याने पिकांच्या मुळ्यामधून वरच्या अवयवापर्यंत पोहचण्याकरिता उशीर लागतो. परिणामी बोरॉन कमतरतेची लक्षणे नवीन कोवळी पाने, उमलत्या कळ्या, वाढबिंदू इत्यादीवर स्पष्ट दिसतात. कोवळी पाने आणि कळ्या गळतात. पेशी ठिसूळ, कठीण आणि कोरडे होतात. फुले कमी येतात, फळे ठिसूळ होतात व त्यावर भेगा पडतात. क्लोरीन   सर्वसाधारपणे जमिनीमध्ये पिकांना लागणारी क्लोरीनची कमतरता व्यापक प्रमाणावर दिसत नाही. मात्र नारळ आणि पाम ऑइल पिकांना क्लोरिनची गरज भासते. क्लोराइडयुक्त खतांच्या वापरातून त्याची पूर्तता करता येते. खते पोटॅशिअम क्लोराइड (४७ टक्के क्लोराईड), अमोनियम क्लोराइड (५२ टक्के क्लोराइड) आणि मॅग्नेशियम क्लोराइड (७४ टक्के क्लोराइड). वापरण्याची पद्धत पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीवर फेकून किंवा वरखते म्हणून नत्राबरोबर क्लोराइडचा वापर करता येतो. वनस्पतीतील कार्य प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी प्राणवायूची निर्मिती करण्याच्या कामी क्लोरिनची गरज असते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवेळी पेशीतील रसाकर्षण दाब उंचावतो. पेशीकोशातील आर्द्रता टिकविली जाते. कमतरतेची लक्षणे क्लोरिनच्या कमतरतेमुळे नवीन पानांत पिवळेपणा दिसतो. पाने निस्तेज होतात. टोमॅटोच्या पानाच्या कडा क्लोरिनच्या कमतरतेमुळे करपतात.     संपर्क : ज्योती सहाणे, ९१४६१९११९० (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, संगमनेर, जि. नगर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com