agricultural news in marathi , deformities in cabbage class vegetables ,AGROWON, Maharashtra | Agrowon

कोबीवर्गीय पिकांतील बटनिंग, ब्राऊन रॉट, व्हिप टेल विकृती
ए.टी. दौंडे, डॉ. डी. एन. धुतराज, डॉ. के. टी. आपेट
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

कोबीवर्गीय पिकात सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरता, प्रतिकूल तापमान व शरीर दोषामुळे विविध प्रकारच्या शारीरिक विकृती आढळतात. अशा विकृतीग्रस्त गड्ड्यांना बाजारात अजिबात मागणी नसते. त्यामुळे विकृतींच्या कारणांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत.

कोबीवर्गीय पिकात बटनिंग, ब्राउन रॉट, व्हिप टेल , रायसिनेस, ब्लाइंडनेस, लीफ टीप बर्न आदी विकृती निर्माण होतात. त्यापैकी बटनिंग, ब्राउन रॉट, व्हिप टेल या विकृतींची कारणे, लक्षणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ.   

कोबीवर्गीय पिकात सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरता, प्रतिकूल तापमान व शरीर दोषामुळे विविध प्रकारच्या शारीरिक विकृती आढळतात. अशा विकृतीग्रस्त गड्ड्यांना बाजारात अजिबात मागणी नसते. त्यामुळे विकृतींच्या कारणांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत.

कोबीवर्गीय पिकात बटनिंग, ब्राउन रॉट, व्हिप टेल , रायसिनेस, ब्लाइंडनेस, लीफ टीप बर्न आदी विकृती निर्माण होतात. त्यापैकी बटनिंग, ब्राउन रॉट, व्हिप टेल या विकृतींची कारणे, लक्षणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ.   

बटनिंग (गड्डा अतिलहान पडणे) :  ही विकृती फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर दिसते.
कारणे : नत्र या अन्नद्रव्याची कमतरता, शीत तापमानाचा लहान रोपांवर दुष्परिणाम, पाण्याचा ताण किंवा झाडाच्या शाखीय वाढीस अटकाव आणणारे इतर घटक.
लक्षणे : फ्लॉवरचा गड्डा अतिशय लहान बटनासारखा येतो

उपाय:

  • वाढ खुंटलेली, जुनी रोपे पुनर्लागवडीस वापरायचे टाळावे.
  • रोपांच्या वाढीच्या काळात नत्रयुक्त खते शिफारशी प्रमाणात द्यावीत.
  • पाणी, आंतरमशागत, कीड व रोगनियंत्रण आदींबाबत योग्य काळजी घ्यावी.
  • लागवड वेळेवर करावी. लवकर येणाऱ्या जाती उशिरा लागवडीसाठी वापरू नयेत.

ब्राउन रॉट (गड्डा कुजणे) : ही विकृती फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते.
कारणे : बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते.
लक्षणे : खोड व गड्ड्यावर भुरकट डाग दिसतात आणि त्यातून पाणी बाहेर येते. गड्ड्याचा दांडा पोकळ, काळपट पडून कुजू लागतो. संपूर्ण गड्ड्यावर भुरकट काळे, कुजकट डाग दिसतात. वालुकामय जमिनीत ही विकृती अधिक प्रमाणात होते.

उपाय:

  • जमिनीत बोरॅक्स पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात मिसळून घ्यावी  
  • लागवडीनंतर ३० दिवसांनी बोरॅक्स पावडर एक किलो प्रति ५०० लिटर पाण्यातून पिकावर फवारणी करावी.
  • शेतात सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी २० ते २५ टन वापर करावा.
  • एकच पीक वारंवार न घेता पिकांची फेरपालट करावी.

व्हिप टेल : ही विकृती शक्यतो फुलकोबीवर दिसते.
कारणे : जमिनीत मॉलिब्डेनम या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता किंवा आम्लधर्मीय जमिनीचा सामू ५ पेक्षा कमी अशा ठिकाणी ही विकृती दिसून येते.
लक्षणे : पाने व्यवस्थित विकसित न होता अरुंद आणि खुरटलेली कातडी चाबकाच्या (व्हिप टेल) टोकासारखे लांब वाढलेले दिसतात. बऱ्याच वेळेस फक्त पानाच्या मुख्य शिरा विकसित होतात. झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो आणि गड्डा भरत नाही.

उपाय:

  • आम्लधर्मीय जमिनीचा सामू वाढविण्यासाठी चुनखडीचा वापर करावा.
  • लागवडीपूर्वी हेक्टरी १.२ किलो सोडियम मॉलिब्डेट किंवा अमोनियम मॉलिब्डेट जमिनीत मिसळल्यास ही विकृती टाळता येते.

संपर्क : ए. टी. दौंडे, ७५८८०८२००८.
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प भाजीपाला पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...