agricultural news in marathi, disease control on cabbage class crops , Agrowon, Maharashtra | Agrowon

कोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण
चिमाजी बाचकर, सोमनाथ पवार
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरण, कमी-जास्त होणारी थंडी अशा वातावरणात मुळावरील गाठी, करपा, केवडा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रोगाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

मुळावरील गाठी (क्लब रुट) :
लक्षणे :

सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरण, कमी-जास्त होणारी थंडी अशा वातावरणात मुळावरील गाठी, करपा, केवडा, भुरी आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रोगाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

मुळावरील गाठी (क्लब रुट) :
लक्षणे :

 • प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून सुकतात. गड्डे लहान आकाराचे येतात.
 • मुळावर गाठी आलेल्या दिसतात. मुख्य खोडाचा भाग फुगीर, खुरटा आणि काळसर पडून कुजतो.
 • जमिनीचा सामू ७ पेक्षा कमी आहे, अशा जमिनीत रोगाचे प्रमाण जास्त असते.

नियंत्रण :

 • रोगट झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
 • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी.

करपा (ब्लॅक लिफ स्पॉट) :
लक्षणे  :

 • रोगाचा प्रादुर्भाव बियाणे व रोगग्रस्त अवशेषांपासून होतो. प्रसार कीटक आणि हवेमार्फत होतो.
 • प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात.
 • ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात.
 • कोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.

नियंत्रण :

 • रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
 • फवारणी (प्रति लिटर पाणी)
  मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा
  कॉपर आॅक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम किंवा
  क्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि.

केवडा (डाऊनी मिल्ड्यू) :
लक्षणे :

 • रोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तसेच रोगग्रस्त झाडाचे अवशेष, पाणी व वाऱ्यामार्फत दुय्यम प्रसार होतो.
 • रोगामुळे पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे तर खालील भागावर जांभळट, तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सदर डागांवर नंतर भुरकट बुरशीची वाढ होते.
 • प्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त प्रमाणात होतो. पोषक वातावरणात संपूर्ण पाने करपून रोपे मरतात.
 • पुनर्लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. त्यामुळे गड्डे चांगले पोसत नाहीत. गड्ड्यांची काढणी लांबल्यास त्यावर तपकिरी काळपट चट्टे पडतात आणि ते सडू लागतात.
 • फुलकोबीचा मुख्य दांडा व आतील भाग काळा पडून सडतो.

नियंत्रण :

 • पीक स्वच्छ तणविरहित ठेवावे.
 • फवारणी (प्रति लिटर पाणी)   
  मेटॅलॅक्‍झिल अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा 
  क्‍लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट २ मि.लि.

संपर्क : चिमाजी बाचकर, ९४०४६१२४६१
(अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...