उसासाठी शिफारशीनुसारच करा खताचे नियोजन

उसाला ठिबकसिंचनातून खते दिल्याने चांगली वाढ होते.
उसाला ठिबकसिंचनातून खते दिल्याने चांगली वाढ होते.

ऊस पिकाला माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. ठिबक सिंचनप्रणालीची योग्य काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्यानुसार पीक व्यवस्थापन करावे. ऊस लागवडीनंतर ४५, ६५ व ८५ दिवसानंतर जिबरेलिक ॲसिड (५० पीपीएम) व त्यामध्ये पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते १२:६१:०० (मोनो-अमोनियम फॉस्फेट ) व १९:१९:१९ मिसळून फवारणी करावी. त्यामुळे उसाच्या पानाची लांबी रुंदी वाढते. एकूण प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून अन्न तयार करण्याचे प्रमाण वाढते. परिणामी फुटव्यांची जाडी वाढते. कोंबांची/फुटव्यांची जाडी वाढल्याने सुरवातीपासून उसाची जाडी वाढण्यासाठी भक्कम पाया निर्माण होतो. उसाचे सरासरी वजन वाढण्यासाठी याचा फायदा होतो.

फर्टिगेशन करतानाची काळजी

  • ऊस लागवडीनंतर १५ दिवसांनी फर्टिगेशन सुरू करावे.
  • रासायनिक खतांचा प्रभावी परिणाम मिळण्यासाठी हलक्या जमिनीत प्रत्येक चार दिवसांनी फर्टिगेशन करावे. मध्यम व भारी जमिनीसाठी प्रतिआठवड्यास फर्टिगेशन करावे.
  • प्रत्येक चार दिवसांनी फर्टिगेशन करण्यासाठी वरील वेळापत्रकात आठवड्यासाठी दिलेली खतमात्रा अर्धी करून वापरावी.
  • खतांचे द्रावण करीत असताना सर्वप्रथम पांढरा पोटॅश, त्यानंतर १२:६१:०० व सर्वात शेवटी अमोनियम सल्फेट, युरिया अनुक्रमे प्रति किलो खतांसाठी ५, ४ व ३ लिटर पाणी या प्रमाणात पूर्णपणे विरघळून घ्यावे.
  • दिलेली रासायनिक खते जमिनीत सम प्रमाणात मिळण्यासाठी ५०-६० टक्के पाणी दिल्यानंतर १२-१५ मिनिटे फर्टिगेशन करून त्यानंतर १०-१५ मिनिटे परत पाणी द्यावे.
  • ह्युमिक ॲसिड दर महिन्यास दोन लिटर प्रतिएकर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १२ महिन्यापर्यंत स्वतंत्ररीत्या वापरावे.
  • एकरी ४० किलो मॅग्नेशियम सल्फेट दर महिन्यास ५ किलो किंवा १८० दिवसानंतर प्रति आठवडा २ किलो स्वतंत्ररीत्या याप्रमाणे फर्टिगेशन करावे.
  • ठिबक सिंचन संचाची नियमित देखभाल व निगा :

  • सबमेन व सबमेन दर ३ दिवसांनी फ्लश करावी (सब-सरफेस)
  • ठिबक सिंचन योग्य दाबावरच चालवावा (किमान १.२५ ते १.५० किलो प्रति वर्ग सें.मी.)
  • स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर दररोज स्वच्छ करावा.
  • सँड फिल्टर दररोज बॅकवॉश करावा.
  • सॅंड सेपरेटर किंवा हायड्रोसायक्लॉन फिल्टर दररोज साफ करावा.
  • फर्टिगेशन झाल्यानंतर प्रत्येकवेळी फर्टिलायझर टँक साफ करावा.
  • अॅसिड प्रक्रिया- पाण्याची क्षारता (Ec) (mm hos/cm) (विद्युत वाहकता) १ पेक्षा जास्त असल्यास तीन महिन्यांतून एकदा आणि क्षारता १ पेक्षा कमी असल्यास सहा महिन्यातून एकदा व ०.५ पेक्षा कमी असल्यास ॲसिड प्रक्रिया असल्यास वर्षातून एकदा करावी.
  • क्लोरिन प्रक्रिया- किमान ६ महिन्यातून एकदा क्लोरीन ट्रिटमेंट करावी.
  • महिन्यातून एकदा एन्डकॅप काढून ठिबक नळ्या साफ कराव्यात. यासाठी एकावेळेस फक्त ८ ते १० एन्डकॅप काढाव्यात. पाण्याचा दाब कमी न होता सफाई शक्य होईल.
  • टीप  ः वरील लेखामध्ये दिलेल्या खतमात्रामध्ये ऊस लागवडीपूर्वी माती परीक्षण करून योग्य प्रमाणात कमी जास्त कराव्यात. ऊस पिकाचे उत्पादन हे खतासोबतच मातीतील सेंद्रीय कर्ब, पाण्याचे नियोजन, रोगकिडींचे वेळेवर नियंत्रण आणि हवामान यावरही अवलंबून असते. स्थानिक हवामानानुसार १० ते १५ टक्क्यापर्यंत फरक पडू शकतो, हे लक्षात घ्यावे.

    ऊस लागवडीवेळी जमिनीतून द्यावयाचा बेसल डोस :

    अ. क्र.        तक्ता क्र. १     २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १२० किलो पालाश   -   तक्ता क्र.२
    - सरी डोस (बेसल डोस)        किलो/एकर       मोठ्या बांधणीच्या वेळी (१०० ते ११० दिवसांनी)       किलो/एकर
    - - -   शेण खत     ५००
    १      शेण खत     ५००      कंपोस्ट खत      २००
    २      कंपोस्ट खत      २००      सिंगल सुपर फॉस्फेट      २००
    ३      सिंगल सुपर फॉस्फेट        १००      निंबोळी पेंड      १००
    ४      निंबोळी पेंड       १००      एकुण       १०००
    ५      फिप्रोनिल       ५      टीप :  १) लागणीच्या वेळी मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये २०० किलो कंपोस्ट अधिक ५०० किलो शेणखतात मिसळून तक्ता क्र.१ नुसार रोप बगला फोडल्यानंतर चळीमध्ये टाकून भरणी करावी. -
    ६      ह्युमिक ॲसिड ग्रॅन्युअल्स      १०      - -
    ७       फेरस सल्फेट (१९ टक्के)       १०      - -
    ८       झिंक सल्फेट (२१ टक्के)       १०    - -
    ९       मॅंगेनिज सल्फेट (३१ टक्के)     ५    टीप ः २) मोठी बांधणी / भरणीच्या वेळी बगला फोडल्यानंतर सरीमध्ये मोठ्या बांंधणीची खत मात्रा तक्ता क्र. २ नुसार टाकून भरणी करावी. भरणी केल्याने मातीचा घट्ट बोद तयार करावा. -
    १०      मॅग्नेशियम सल्फेट(९.५ टक्के)       १०      - -
    एकूण   ९५०         

    एक एकरसाठी फर्टिगेशनचे वेळापत्रक (७० ते ८० मे. टन ऊस उत्पादन/एकरी) एकूण खत मात्रा प्रतिएकर : २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १२० किलो पालाश

    - - प्रति आठवड्यांनी खत मात्रा प्रति एकर (किलो) - - - - - -
    ऊस पीक वाढीच्या अवस्था    एकूण खते देण्याचे दिवस       खते देण्याची संख्या       युरिया     अमोनियम सल्फेट    १२:६१:०० (MAP)      फॉस्फरीक ॲसिड    मॅग्नेशियम सल्फेट (९.५ %) पांढरा पोटॅश (MOP)
    ऊस लागणीनंतर (१५ ते ४५ दिवस)       ३०          ४       ७.५०       -   -    १.६ (१ लिटर)      -     ३.१२५
    फूटवा फुटणे (४६ ते ९० दिवस)       ४५       ६     १०.००  १०.०० ३.००    - -  ४.१६७
    कांडी सुटणे (९१ ते १८० दिवस)      ९०      १२       १७.५०      ८.००       २.५०      १.६ (१ लिटर)      २       ६.२५०
    जोमदार वाढ (१८१ ते २४० दिवस)       ६०      ८      -       ८.००      -      १.६ (१ लिटर)      २       १०.९३७
    एकूण खतमात्रा (प्रति एकर) -    ३०      ३००      २२०       ४८       ३८.४०       ४०      २००

    (MAP-मोनो-अमोनिअम फॉस्फेट), (MOP - म्युरेट ऑफ पोटॅश) फर्टिगेशनचे वेळापत्रक (एकरी १०० मे. टन उत्पादन ध्येयासाठी) एकूण खतमात्रा : नत्र २४५ किलो, स्फुरद १३९ किलो व पालाश १५० किलो

    ऊस पीक वाढीच्या अवस्था      एकूण खते देण्याचे दिवस       खते देण्याची संख्या     प्रतिआठवडा खत मात्रा प्रतिएकर (किलो)  प्रतिआठवडा खत मात्रा प्रतिएकर (किलो)  प्रतिआठवडा खत मात्रा प्रतिएकर (किलो)  प्रतिआठवडा खत मात्रा प्रतिएकर (किलो)  प्रतिआठवडा खत मात्रा प्रतिएकर (किलो)  प्रतिआठवडा खत मात्रा प्रतिएकर (किलो)
    - - -      युरिया      अमोनियम सल्फेट       १२:६१ः० (MAP)       फॉस्फरिक ॲसिड       पांढरा पोटॅश (MOP)     मॅग्नेशिअम सल्फेट
    उगवण (०-४५ दिवस)      ३०      ४       १०       १०      -      ३.२       ४       -
    फुटवा फुटणे (४६-९० दिवस)       ४५       ६      २५       -      ४       -     ५       -
    कांडी सुटणे (९१-१८० दिवस)      ९०       १२      १५       १५      ३.४१      ३.२       ८     
    पक्वता (१८१-२४० दिवस)      ६०       ८     -  १० - ३.२      १३.५०       २
    एकूण खतमात्रा     -     ३० ३७०    ३००       ८४    ७६.८     २५०      ४०

    जिबरेलिक ॲसिड (५० पीपीएम) फवारणीचे वेळापत्रक

    जिबरेलिक ॲसिड अधिक अल्कोहोल      १२:६१:००    १९:१९:१९   पाणी ऊस लागणीनंतर/तुटल्यानंतर फवारणी
    ५ ग्रॅम अधिक २५० मि.लि.   १ किलो     १ किलो        १०० लिटर    पहिली फवारणी ४५ दिवसांनी.
    ७.५ ग्रॅम अधिक ५०० मि.लि.    १.५ किलो   १.५ किलो   १५० लिटर दुसरी फवारणी ६५ दिवसांनी.
    १० ग्रॅम अधिक ५०० मि.लि.     २ किलो   २ किलो        २०० लिटर     तिसरी फवारणी ८५ दिवसांनी.

    टीप : वरील वेळापत्रक हे केवळ मार्गदर्शक आहे. प्रत्यक्ष वापरापूर्वी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील शिफारशी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक संयुक्तिक ठरेल.   जमिनीतून ऊस पिकास द्यावयाची एकरी खतमात्रा ः

    संपर्क : विजय माळी, ०९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com