शेवगा पीक सल्ला

ओलावा व्यवस्थापनासाठी शेवगा पिकाला आच्छादन करावे.
ओलावा व्यवस्थापनासाठी शेवगा पिकाला आच्छादन करावे.

सद्यस्थितीत राज्यात थंडीची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. दुपारी उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत अाहे. अशावेळी शेवगा पिकात आंतरमशागत, नवीन बहरासाठी छाटणी आदी कामे हाती घ्यावीत. छाटणीनंतर योग्य खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे नवीन बहरातही शेंगांचे भरपूर उत्पादन मिळते. आंतरमशागत व छाटणी :

  • झाडाच्या भोवताली व दोन झाडांच्या ओळींमधील माती कोळपणी करून हलवून घ्यावी. त्यामुळे तणनियंत्रणही होते तसेच माती भुसभूशीत झाल्याने मुळांना हवा मिळते. परिणामी भरपूर फुलधारणा व शेंगा लागतात. कोळपणीमुळे जमिनीतील भेगा बुजविल्या जाऊन जमिनीतील उपलब्ध ओलावा कायम राखता येतो.
  • शेवग्याच्या काही जातींना वर्षातून एकवेळा तर काही जातींना दोन वेळा बहर येतो. त्यामुळे उत्पादन काढल्यानंतर शेवग्याच्या झाडाची छाटणी करावी. म्हणजे फूल धारणा चांगली होऊन नवीन बहरातही भरपूर शेंगा लागतात.   
  • खत व पाणी व्यवस्थापन :

  • छाटणीनंतर प्रतिझाड चांगले कुजलेले शेणखत २-५ किलो व निंबोळी खत १००-२०० ग्रॅम लहान मोठ्या झाडानुसार द्यावे. अधिक उत्पादनासाठी प्रतिझाड नत्र ७५ ग्रॅम व स्फुरद ५० ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी.
  • शेवगा पिकाला पाणी दिल्यानंतर झाडाची वाढ चांगली होते. परिणामी उत्पादन जास्त आणि दर्जेदार मिळते. जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सिंचनासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कोरडवाहू भागामध्ये झाडांच्या वाफ्यात वाळलेल्या गवताचे किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन करावे. आच्छादनामुळे वाफ्यामध्ये ओलावा अधिक काळ राहतो.
  • संपर्क :  डॉ. विजय काळे, ९४२१८१७९५८ (उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com