कोरडवाहू फळपीक सल्ला

कोरडवाहू फळपीक सल्ला

कोरडवाहू फळपिकात सद्यस्थितीत फळे पक्वतेच्या अवस्थेत आहेत. थंडी व ढगाळ वातावरणामुळे फळ व झाडांवर कीड व रोगांच्या प्रादुर्भावाची शक्‍यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. आंबा पिकात मोहोर संरक्षण व पाणी व्यवस्थापन या बाबींकडे लक्ष द्यावे.

केसर आंबा

  • केसर आंबा झाडावर मोहोर फुटण्याच्या वेळी १ टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. त्यानंतर एक महिन्याने १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. त्यामुळे उभयलिंगी फुलांचे प्रमाण वाढून फळधारणा वाढते. उत्पादनातही मोठी वाढ होते.
  • फळ पक्वतेच्या काळात बागेस जमिनीच्या मगदूरानुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने हलकेसे पाणी (३ सें.मी. खोल) पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ७ ते १० दिवसांच्या अंतराने अर्धा तास पाणी द्यावे.
  • सद्यस्थितीत पहाटे थंडी व दिवसा उष्णता असे वातावरण आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो. त्यामुळे खोडाजवळ सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. तसेच झाडांच्या दोन ओळीत ‘व्ही ब्लेड’ने वखरणी करून जमिनीत पडलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात.
  • खतांच्या मात्रा यापूर्वीच संपल्या आहेत. सद्यस्थितीत प्रतिझाड व्हॅम ५०० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू १०० ग्रॅम अधिक अॅझोस्पिरिलम १०० ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा हरजियानम १०० ग्रॅम असे मिश्रण करून मुळांपाशी द्यावे. त्यामुळे बदलत्या वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची मात्रा वाढते. परिणामी फळे वजनदार व तजेलदार होतात. उत्पादनात वाढ होते.
  • लिंबूवर्गीय फळपिके

  • कागदी लिंबू फळबागेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. त्यासाठी झाडावर झिंक सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर) झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर), फेरस सल्फेट ०.३ टक्के (३ ग्रॅम प्रतिलिटर) व कॉपर सल्फेट ०.३ टक्के (३ ग्रॅम प्रतिलिटर) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.
  • बागेस जमिनीच्या मगदूरानुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने हलकेसे पाणी (३ सें.मी. खोल) द्यावे. किंवा ठिबक सिंचन पद्धतीने अर्धा तास पाणी द्यावे.
  • खोडाजवळ सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. तसेच झाडांच्या दोन ओळीत     ‘व्ही ब्लेड’ने वखरणी करावी.
  • पेरू

  • पेरूवर प्रामुख्याने मिलीबग, खवले कीड, फुलकिडे, फळमाशी, पांढरी माशी, खोडात जाळी करणारी अळी, सुत्रकृमी आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तसेच फळसड, फांदीमर, पानावरील ठिपके आणि पेरूवरील देवी इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. देवी हा रोग खूप नुकसानकारक असतो.
  • रोगांच्या नियंत्रणासाठी मॅंकोझेब २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. या प्रमाणात फवारणी करावी. तसेच गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने डायमेथोएट १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • प्रतिझाड ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम अधिक अझोटोबॅक्‍टर २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५ ग्रॅम याप्रमाणात जीवाणू खते द्यावीत.
  • बागेस जमिनीच्या मगदूरानूसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने हलकेसे पाणी (३ सें.मी. खोल) द्यावे. किंवा ठिबक सिंचन पद्धतीने अर्धा तास पाणी द्यावे.
  • खोडाजवळ सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. तसेच झाडांच्या दोन ओळीत ‘व्ही ब्लेड’ने वखरणी करावी.
  • बोर

  • बोरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी वातावरण ढगाळ असताना करावी.
  • बागेस जमिनीच्या मगदुरानुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने हलकेसे पाणी (३ सें.मी. खोल) द्यावे. किंवा ठिबक सिंचन पद्धतीने अर्धा तास पाणी द्यावे.
  • संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६ (प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com