agricultural news in marathi, dryland fruit crops cultivation technology ,AGROWON,Maharashtra | Agrowon

कोरडवाहू फळपीक सल्ला
डॉ. विजय अमृतसागर, डॉ. मंजुनाथ पाटील
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

आंबा :

आंबा :

 • केसर आंबा पिकात जमिनीवर काळ्या पॉलिथीनचे (१०० मायक्रॉन) आच्छादन करावे. काढणीपूर्वी एक महिना अगोदर कॅल्शिअम नायट्रेटची ४० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. या दोन्ही कामांमुळे फळांचे अधिक उत्पादन मिळते. तसेच त्यांचा काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातील बागांमध्ये हा उपक्रम फायदेशीर ठरतो.
 • केसर आंब्यामध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळधारणा आणि उत्पादन वाढविण्यासाठी १ टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेटची (१० ग्रॅम/ लिटर पाणी) मोहोर फुटण्याच्या वेळी फवारणी करावी. त्यानंतर एक महिन्याने १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.
 • गावठी व अनुत्पादक झाडांचे सुधारित जातीमध्ये रूपांतर करण्यासाठी झाडे नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमिनीपासून २ मीटर उंचीवर छाटावीत. फांदीवरील नवीन फुटव्यांवर अनुक्रमे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केशर वाणाचे पाचर कलम करावे.

अंजीर :

 • अंजीराची छाटणी त्वरित संपवावी.
 • छाटणी करताना जमिनीपासून २.५ ते ३ फुटांपर्यंत खोड ठेवावे. खोडावर ४-५ प्राथमिक फांद्या राखाव्यात.
 • फळ पक्वतेच्या काळात बागेस जमिनीच्या मगदुरानुसार ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा १ ते २ ग्रॅम प्रतिलिटर चिलेटेड लोहची फवारणी करावी.

 
कागदी लिंबू :

 • हस्त बहर धरलेल्या कागदी लिंबू बागेस सप्टेंबरमध्ये प्रतिझाड १५० ग्रॅम नत्र देणे आवश्‍यक असते. ते दिले नसल्यास त्वरित द्यावे. त्यानंतर जानेवारी महिन्यात १५० ग्रॅम नत्र प्रतिझाड द्यावे.
  वरील खतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम (व्हॅस्कुलर अर्बिस्क्युलर मायकोरायझा) अधिक १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू अधिक १०० ग्रॅम अझोस्पिरिलम अधिक १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियॅनम द्यावे.
 • सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास ०.५ टक्के झिंक सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर), ०.५ टक्के मॅग्नेशियम सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर), ०.५ टक्के मॅंगनीज सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) आणि ०.३ टक्के फेरस सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) व ०.३ टक्के कॉपर सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) या सुक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.
 • पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१०० ग्रॅम प्रतिलिटर) द्रावणाची फवारणी करावी.

मोसंबी :

 • झिंक, लोह, मॅंगनिज व मॅग्नेशियम कमतरता असलेल्या बागेमध्ये ०.३ टक्के फेरस सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर), ०.३ टक्के झिंक सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) ०.३ टक्के मॅंगनीज सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) व ०.३ टक्के मॅग्नेशियम सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर) ची फवारणी करावी. सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीमुळे फुलगळ न होता दर्जेदार फळे लागण्यास मदत होते.

पेरू :

 • हस्त बहर धरलेल्‍या पेरू बागेला नत्र ४५० ग्रॅम प्रतिझाड अशी खतमात्रा द्यावी. पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मगदुरानुसार ८ -१० दिवसांच्या अंतराने करावे.
 • दर्जेदार व तजेलदार फळांच्या उत्पादनासाठी प्रतिझाड २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्‍टर, २५ ग्रॅम पीएसबी अशी जिवाणू खतांची मात्रा द्यावी.

बोर :

 • फळाची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.

आवळा :

 • जमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
 • फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ते २ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.
   

संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६
(विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर)

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...