शेडनेट यंत्रणा कमी करेल गोठ्यातील तापमान

गोठ्यात सावली पडावी यासाठी शेडनेटचा वापर फायदेशीर ठरताे.
गोठ्यात सावली पडावी यासाठी शेडनेटचा वापर फायदेशीर ठरताे.

ऑस्ट्रेलियामधील एका कंपनीने गोठ्यातील जनावरांचे तीव्र उन्हाच्या झळांपासून संरक्षण व्हावे, यासाठी नवीन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचा वापर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या पशू संगोपन केंद्रावर करण्यात आला आहे. त्यामुळे पशू संगोपन केंद्रातील तापमानात २० ते ३० अंश फॅरेन्हाईट (साधारणपणे १ते ७ अंश सेल्सिअस) इतकी घट होत असल्याचे दिसून आले आहे.

कंपनीने लोखंडी खांब, तारा व शेडनेट यांचा वापर करून गोठ्यामध्ये सावली पडेल अशी व्यवस्था केली आहे. या यंत्रणेचा वापर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या पशू संगोपन केंद्रावर करण्यात आला आहे. पशू संगोपन केंद्रामध्ये तेरा विभागांत जनावरांचे संगोपन केले जाते. यंदाच्या वर्षी या केंद्रात तीव्र उन्हाळ्यातही गोठ्यामध्ये सावली रहावी यासाठी ही पद्धत बसविण्यात आली. यंत्रणेमध्ये तारा, लाेखंडी खांब यांचा वापर करण्यात आला. विशिष्ट अंतरांवर लोखंडी खांब रोवून त्यांच्यावर पुरेशा उंचीवर तारा बांधण्यात आल्या. तारांवर बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे आलटून पालटून एका भागात ३९ फुट  x ५६ फूट लांबी रुंदीचे शेडनेटचे कापड बांधण्यात आले, तर दुसरा भाग मोकळा सोडण्यात आला. परिणामी शेडनेटमुळे सुमारे ७० टक्के अतिनील किरणांना गोठ्यात शिरण्यापासून रोखता आले. त्यामुळे गोठ्यातील तापमानात माेठी घट झाली.

याबाबत माहिती देताना पशूसंगोपन केंद्राचे संचालक नाथन रीव्हज म्हणाले की, ‘‘या यंत्रणेमुळे पशू संगोपन केंद्रातील तापमान २० ते ३० अंश फॅरेन्हाईट (साधारणपणे १ ते ७ अंश सेल्सिअस) इतके कमी झाले. टेक्सासमध्ये उन्हाळ्यात असणाऱ्या असह्य वातावरणातही शेडनेटमधील वातावरण आल्हाददायक राहीले. त्यामुळे उष्ण वातावरणामुळे जनावरांच्या आराेग्यावर होणारे मोठे दुष्परिणाम टाळता आले.

यंत्रणेमुळे झालेले फायदे

  • टेक्सासमध्ये उन्हाळ्यात अत्यंत असह्य वातावरण असते, तसेच ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहतात. मात्र या यंत्रणेमुळे उष्ण वातावरण व वेगवान वाऱ्यालाही अटकाव करता आला.
  • बुध्दिबळासारख्या शेडनेटच्या रचनेमुळे मोकळ्या भागातून काही प्रमाणात वारे व उष्णता आत आल्यामुळे गोठ्यातील जमीन कोरडी राहण्यास मदत झाली. त्यामुळे गोठ्यात आल्हाददायक व निरोगी वातावरणाची निर्मिती झाली.
  • हिवाळ्यात जेव्हा बर्फ पडतो तेव्हा शेडनेट गुंडाळून ठेवता येते. त्यामुळे त्याच्यावर बर्फ पडून ते काेसळण्याची शक्यता रहात नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com