agricultural news in marathi, effects of climate change on organisms, Agrowon, Maharashtra | Agrowon

वातावरणातील बदलांचा फटका बसतो प्रवाळांना
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

वातावरणातील बदलामुळे प्रवाळामध्ये क्लोरीनचे प्रमाण अनपेक्षितरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाळांवर सहजिवी पद्धतीने वाढत असलेल्या शेवाळांची वाढ वेगाने होण्याचा धोका असल्याचा दावा हॉंगकॉंग विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. हे निष्कर्ष ‘दी आयएसएनई जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

वातावरणातील बदलामुळे प्रवाळामध्ये क्लोरीनचे प्रमाण अनपेक्षितरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाळांवर सहजिवी पद्धतीने वाढत असलेल्या शेवाळांची वाढ वेगाने होण्याचा धोका असल्याचा दावा हॉंगकॉंग विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. हे निष्कर्ष ‘दी आयएसएनई जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

प्रवाळ आणि शेवाळ यांच्या सहजिवी संबंधामध्ये प्रवाळ शेवाळाच्या वाढीसाठी आधार आणि पोषक घटक पुरवतात. त्या बदल्यात शेवाळ प्रवाळावरील अन्य टाकाऊ घटकांचा पूर्वापर प्रकाश संश्लेषणातून करते. त्यातून तयार होणारी शर्करा आणि प्रथिने प्रवाळांनाही पुरवते. पाण्याचे तापमान वाढत असून, त्यामुळे प्रवाळातील ऊर्जेचा अधिक वापर होऊन त्यात ताण निर्माण होतो. सागराचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होताच प्रवाळावर वाढणारे शेवाळ (सिंबोडियम) आपल्या यजमानापासून वेगळे होते. प्रवाळाची पांढरी बाजू उघडी पडते.
या प्रक्रियेला ब्लिचिंग असेही म्हटले जाते. प्रवाळाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेच्या ९५ टक्के भाग हा शेवाळाकडून मिळत असतो. शेवाळाने साथ सोडल्यामुळे प्रवाळ मरण्याची शक्यता वाढते. हॉंगकॉंग विद्यापीठातील डॉ. डेव्हिड बेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये सिंबोडियमवर उच्च तापमानाचा परिणाम अत्यंत कमी होतो. तसेच ते प्रवाळापासून आपली सुटका करून घेऊ शकते. दोघांच्या सहजिवी संबंधातील चलन म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन असून, प्रवाळातील या घटकांचा वापर करून शेवाळ शर्करा आणि प्रथिनांची वेगाने निर्मिती करते. यात फटका प्रवाळांनाच बसतो.
 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...
सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी...सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर...
सोयापदार्थाच्या साह्याने कुपोषणाशी...कुपोषणाच्या समस्येशी सामना करण्यासाठी...
गिरणा धरणाचे पाणी जळगाव हद्दीत पोचलेजळगाव : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातून तीन, तर...
मालेगाव, सिन्नरसह आठ तालुक्यांत चारा...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी...
परभणीत चारा, वैरणीच्या दरात सुधारणा परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
‘भीमा'तर्फे प्रतिटन शंभर रुपयांचे वाटपसोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...