agricultural news in marathi, effects of excess water on grapes , Agrowon, Maharashtra | Agrowon

अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर होईल विपरीत परिणाम
डॉ. आर. जी. सोमकुंवर
रविवार, 21 जानेवारी 2018

द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या उत्पादनामध्ये वाढ मिळविण्यासाठी वाढीच्या ठराविक अवस्थेमध्ये संतुलित पाणी देणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये विशिष्ट वाढीच्या अवस्थेमध्ये गरजेपेक्षा एकतर कमी किंवा अधिक पाणी मिळते. पाणी कमी झाले तरी वेलीवर अनिष्ट परिणाम होतात. पाणी जास्त झाले तरीसुद्धा वेलीच्या व घडाच्या विकासावर अनिष्ट परिणाम होतात.

जास्त पाण्याचे जमिनीवरील दुष्परिणाम :

द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या उत्पादनामध्ये वाढ मिळविण्यासाठी वाढीच्या ठराविक अवस्थेमध्ये संतुलित पाणी देणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये विशिष्ट वाढीच्या अवस्थेमध्ये गरजेपेक्षा एकतर कमी किंवा अधिक पाणी मिळते. पाणी कमी झाले तरी वेलीवर अनिष्ट परिणाम होतात. पाणी जास्त झाले तरीसुद्धा वेलीच्या व घडाच्या विकासावर अनिष्ट परिणाम होतात.

जास्त पाण्याचे जमिनीवरील दुष्परिणाम :

  • आपल्याकडे हलक्या व भारी अशा प्रकारच्या दोन जमिनी आहेत. त्यातील भारी जमिनीमध्ये जास्त पाणी झाल्यास जमिनीतील मातीच्या कणांचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत पाणी जास्त प्रमाणात व जास्त काळ धरून राहील. यामुळे मुळींचा विकास थांबेल. मुळी काळी पडेल व कार्य करणे थांबेल. याच जमिनीमध्ये जास्त पाणी असलेल्या परिस्थितीमध्ये जास्त तापमान असताना बाष्पोत्सोर्जन वाढेल. जमिनीतील अन्नद्रव्येही पाण्यासोबत उचलली जातील, अशा वेळी वेलीच्या वाढीचा जोम वाढेल. या तुलनेमध्ये कमी तापमानामध्ये वेलीवर फारसे परिणाम दिसणार नाहीत.
  • हलकी जमिनीमध्ये पाण्याचे वहन सरळ असल्यामुळे मुळांच्या परिसरात पाणी धरून राहणार नाही. या जमिनीत पाणी धरून ठरवण्याची क्षमता असल्यामुळे पाणी मुळाच्या कक्षेच्या बाहेर जाईल. त्यामुळे अशा जमिनीत वेलीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता कमी असेल.
  • जास्त पाणी झालेल्या परिस्थितीत व खोलपर्यंत पाणी गेलेल्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांच्या व हानिकारक आयन्स यांचे लिचिंग झाल्यामुळे भूजलाचे प्रदूषणाची शक्यता वाढेल.

 द्राक्ष वेलीवरील परिणाम :
ज्या परिस्थितीत वेल पाणी जास्त उचलून घेईल, अशा वेळी वेलीच्या वाढीचा जोम जास्त असेल. ही परिस्थिती घड निर्मितीच्या कालावधीमध्ये आल्यास घड निर्मितीवर विपरीत परिणाम होईल. वेलीमध्ये गर्भधारणा होण्याचे प्रमाण कमी होईल. जास्त पाण्यामुळे मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी होते. परिणामी अन्नद्रव्ये उचलण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे मण्यांचा आकार कमी राहील. या सर्व गोष्टींचा उत्पादनात घट येईल. मुळाच्या कक्षेतील अन्नद्रव्ये वाहून गेल्यामुळे महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येईल. (उदा. क्लोरोसिस, फेरस कमतरता, पाने पिवळी पडणे, नत्राची कमतरता इ.) त्यामुळे वेलीची अन्नद्रव्याची गरज व उपलब्धता यामधील समतोल बिघडेल. उत्पादनात घट येईल.

संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...