भाजीपाल्यास द्या गरजेइतकेच पाणी

गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून लागवड केल्याने अतिरिक्त पाण्याची समस्या निर्माण होत नाही.
गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून लागवड केल्याने अतिरिक्त पाण्याची समस्या निर्माण होत नाही.

भाजीपाला पिकास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जमिनीचा मगदूर, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, जमिनीची रचना व घटक, वातावरणातील तापमान आणि भाजीपाला पिकाचे आनुवंशिक गुणधर्म या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. अतिपाण्यामुळे भाजीपाल्यामध्ये मुळकूज, रोपे कोलमडणे, मर, कंदसड, फळसड यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

मुळांवर परिणाम : भाजीपाला पिकांची मुळे ३० ते ६० सें.मी. खोलीपर्यंत वाढत असतात. जमिनीत या खोलीपर्यंत मुळांजवळ पाणी साचून राहिल्यास मुळांची श्‍वसनाची क्रिया मंदावते. परिणामी अन्नद्रव्य शोषण व जमिनीत आधार मिळविणे या दोन्ही कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

पुनरुत्पादन अवस्था : फुलोरा किंवा फळवाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकात अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा आवश्‍यक असताे. अतिरिक्त पाण्यामुळे मुळांची कार्यक्षमता घटून अन्नद्रव्यांचा पुरवठा अपुरा होतो. परिणामी पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होऊन उत्पादनात व दर्जात घट होते. उदा. टोमॅटो किंवा ढोबळी मिरची पिकात जी चकाकी आवश्‍यक असते ती मिळत नाही. फळसडसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून दर मिळत नाही.

अतिपाण्याचा परिणाम :

  • प्रमाणापेक्षा अधिक पाणी दिल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचे मार्गक्रमण गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने किंवा समांतर प्रभागात विषम किंवा समांतर प्रमाणात होते. काळी जमिनीत ते पसरते आणि हलक्या जमिनीत खोलवर जाते. परिणामी काळ्या जमिनीत अतिपाण्याचा भाजीपाला पिकांवर जास्त दुष्परिणाम होतो.
  • वातावरणातील तापमान जमिनीतील पाण्याचे उर्त्सर्जन कमी किंवा अधिक प्रमाणात करण्यास परिणामकारक ठरते. तापमान अधिक असल्यास काळ्या जमिनीतही अतिरिक्त पाण्याचे बाष्पीभवन होऊन पिकांना कमी प्रमाणात फटका बसतो.
  • जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितके तिची अतिरिक्त पाणी शोषून घेण्याची शक्यता वाढते. अशावेळी काही अंशी अतिरिक्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
  • जमिनीत चुना, पिवळी माती व क्षाराचे प्रमाण अधिक असल्यास पाणी साचून राहते. अशा जमिनीत भाजीपाला पिकांचे अधिक नुकसान होते.  
  • भाजीपाला पिकात आनुवंशिकदृष्ट्या तसेच वेगवेगळ्या जातींच्या गुणधर्मानुसार कमी अधिक पाणी सहन करण्याची क्षमता असते. उदा. भेंडी, गवार, चवळी या पिकांना कमी पाणी लागते. तर हळद, आले, कांदा, लसूण या पिकास थोडे अधिक पाणी चालू शकते.
  • उपाययोजना :

  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे भाजीपाला पिकांची निवड करावी.
  • कमी निचऱ्याच्या जमिनीत पालेभाज्या, कडीपत्ता, रताळे, कंदपिके यांची लागवड करावी.
  • पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, काकडी, कोहळा, फ्लॉवर, कोबी इत्यादी पिकांची लागवड करावी.
  • चुनखडीयुक्त, क्षाराचे प्रमाण जास्त असणाऱ्या, पिवळ्या मातीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीत बटाटा, मिरची, कांदा हळद, आले, तोंडली यांसारखी पिके घेऊ नयेत.
  • संपर्क : डॉ. एस. एस. घावडे, ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com