agricultural news in marathi, efforts for enhancing verticle farming in cities, Agrowon, Maharashtra | Agrowon

शहरात व्हर्टिकल फार्मिंग रुजवण्यासाठी प्रयत्न
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

कॅनडामधील लोकल ग्रोस सलाड या स्वयंसेवी संस्थेने शहरी लोकांची बाग कामाची आवडीला चालना देण्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग तंत्राची मदत घेतली आहे.

कॅनडामधील लोकल ग्रोस सलाड या स्वयंसेवी संस्थेने शहरी लोकांची बाग कामाची आवडीला चालना देण्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग तंत्राची मदत घेतली आहे.

ओंतारिओ भागातील सायन्स सिटीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हर्टिकल फार्मिंगची सुरवात केली. त्यातून लोकांना ताज्या भाज्यांची उपलब्धता होणार आहे. या नव्या प्रकल्पाबद्दल लोकल ग्रो सलाड या संस्थेचे अध्यक्ष झेल टबाकमन म्हणाले की, शहरी भागात मोठ्या इमारतींमध्ये बागकाम करता येत नाही. जागेची कमतरता असलेल्या लोकांना बागकामाची आवड असूनही संधी मिळत नाही. अशा लोकांना व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून भाजीपाला लागवडीची संधी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यातून लोकांना बागकामांच्या आनंदासोबतच ताजा भाजीपाला उपलब्ध होऊ शकेल. अतिरीक्त भाजीपाल्याची पॅकींग करून विक्रीही केल्याने आर्थिक फायदाही होईल अशी आशा आहे.  

  • सध्या दोन हजार चौरस फूट क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात अाला आहे. उपलब्ध जागेचा कमाल वापर करण्यासाठी व्हर्टिकल फार्मिगद्वारे भाजीपाला उत्पादन घेण्यात येत आहे.   
  • सध्या चेरी टोमॅटो, पालक, रोमिनी, काकडी, स्टॉबेरी, पालेभाज्यांची लागवड केली अाहे. सहभागी व्यक्तींना ताज्या भाज्या उपलब्ध होतील.
  • या उपक्रमासाठी परिसरातील लोकांचा चांगला सहभाग मिळतो आहे. यात सहभागी लोक भाजीपाला लागवड, व्यवस्थापन आणि काढणी करणार आहेत. त्यामुळे मजुरांचीही आवश्‍यकता भासणार नाही.
  • येत्या काळात भाजीपाला उत्पादनाच्या बरोबरीने ताज्या भाजीपाल्याचे पॅकिंग करून ग्राहकाला विक्री केली जाणार अाहे. पॅकिंगमध्ये विविध भाजीपाला एकत्र करून रेडी-टू- इट प्रकारच्या सॅलडला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.

 

इतर टेक्नोवन
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...
कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...
मका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...
तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...
गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...
डेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...