agricultural news in marathi, farming of algae is future, Agrowon, Maharashtra | Agrowon

शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्य
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

भविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील वाढत्या कर्बाची समस्या अशा अनेक घटकांवर शेवाळाची शेती महत्त्वाची ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक खाद्यान्नाची निर्मिती केवळ जमिनीवरील शेतीतून होऊ शकणार नाही, त्यासाठी पृथ्वीच्या दोन तृतीअंश असलेल्या पाण्याचाही वापर करावा लागणार आहे. अशा पाण्यामध्ये वाढणाऱ्या विविध शेवाळांवर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. कॉर्नेल विद्यापीठ, ड्युक विद्यापीठ आणि हिलो येथील हवाई विद्यापीठातील संशोधक एकत्रितरीत्या या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या अभ्यासातील काही निष्कर्ष ‘अर्थस फ्युचर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

भविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील वाढत्या कर्बाची समस्या अशा अनेक घटकांवर शेवाळाची शेती महत्त्वाची ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक खाद्यान्नाची निर्मिती केवळ जमिनीवरील शेतीतून होऊ शकणार नाही, त्यासाठी पृथ्वीच्या दोन तृतीअंश असलेल्या पाण्याचाही वापर करावा लागणार आहे. अशा पाण्यामध्ये वाढणाऱ्या विविध शेवाळांवर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. कॉर्नेल विद्यापीठ, ड्युक विद्यापीठ आणि हिलो येथील हवाई विद्यापीठातील संशोधक एकत्रितरीत्या या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या अभ्यासातील काही निष्कर्ष ‘अर्थस फ्युचर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

कॉर्नेल विद्यापीठातील भू वातावरण शास्त्राचे प्रा. चार्ल्स ग्रीन म्हणाले की, जागतिक पातळीवर होत असलेल्या वातावणातील बदलांमध्ये कारणीभूत ठरणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडच्या समस्येवर मात करण्यासाठी शैवाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चेस्टर (इंग्लंड) येथील सिंग्लास लि. कंपनीचे इयान आर्चिबाल्ड यांच्या संकल्पनेतून एकत्रित प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्यात पहिल्यांदा संशोधकांनी जैव इंधन निर्मिती आणि कार्बनडाय ऑक्साईड ग्रहण करण्यासाठी शेवाळांवर लक्ष केंद्रित केले असले तरी त्यातील अनेक संभाव्य शक्यता आणि फायदे त्यांच्या लक्षात येत गेले. त्यातून अन्नाची निर्मिती शक्य आहे. उदा. ७००० एकरांवरील अशा प्रकल्पातून तेवढ्याच क्षेत्रातून सोयाबीन उत्पादनातून मिळणारी प्रथिने मिळतील. त्याच वेळी त्यातून १७ दशलक्ष किलोवॉट विद्युत ऊर्जा मिळेल. त्याचप्रमाणे ३० हजार टन कार्बन प्रति वर्ष वापरला जाईल.

  • या प्रकल्पाचा आर्थिक फायदा ठरवताना त्यातून उपलब्ध होणारे पोषक पदार्थ आणि कार्बनची साठवणूक या दोन्ही मुद्द्यांचा विचार करावा लागेल. यातील कार्बन घटकाचा विचार न करताही सध्या मत्स्यशेतीमध्ये शेवाळ निर्मिती करून माशांची वाढ करणेही फायदेशीर ठरत असल्याचा दावा आहे. या माशांसाठी सध्या वापरले जाणारे खाद्य कमी करणे शक्य आहे.
  • भविष्यामध्ये कार्बनची किंमत वाढत जाणार आहे. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी शाश्वत पर्याय शोधावा लागेल.
     
टॅग्स

इतर टेक्नोवन
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...
कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...
मका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...
तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...
गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...
डेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...
ट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची...मजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह...