agricultural news in marathi, fertilisation technology to shevga , Agrowon, Maharashtra | Agrowon

शिफारशीनुसार द्या शेवग्याला खतमात्रा
अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

शेवगा पिकाला शेणखताबरोबरच माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगाचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा.

शेवगा पिकाला शेणखताबरोबरच माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगाचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा.

शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो. त्यामुळे बहार घेताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे. छाटणी झाल्यावर मात्र एकदा शेणखत वापरावे. शेणखताबरोबरच रासायनिक खतांचा वापर करावा. एकरी ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. त्यानंतर ३० ते ४० दिवसांनी पुन्हा एकदा एकरी ५० किलो युरिया द्यावा. माती परीक्षणानुसार जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढ यानुसार नत्राचे प्रमाण कमी-जास्त करावे.

  • पहिला बहार निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात. अशावेळी पुन्हा एकदा वरीलप्रमाणे खतांचे नियोजन करावे.
  • अशाप्रकारे वर्षातून दोनदा रासायनिक खतांचा वापर करावा. शक्य असल्यास सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास शेंगाचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र वापर कमी करावा. शेंगांची फुगवण कमी होत असल्यास तसेच फूलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढविण्यास स्फुरद खतांचा वापर जास्त करावा.

          ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

अवस्था    खते     कालावधी/मात्रा
फुले लागेपर्यंत    १९:१९:१९   दर आठवड्याला
एकरी ५ कि. प्रमाणे
फुले लागल्यानंतर     १२:६१:०, १३:००:४५   आलटून पालटून दर आठवड्याला
एकरी ५ कि. प्रमाणे
शेंगा फुगवण्यासाठी     ००:५२:३४, ०:००:५०   आलटून पालटून दर आठवड्याला
एकरी ५ कि. प्रमाणे

सुधारित जाती :

  • तमिळनाडू कृषी विद्यापीठ - पीकेएम-१ (कोईमतूर-१,), पीकेएम-२ (कोईमतूर-२) हे वाण लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले आहेत. शेंगा दोन ते अडीच फूट लांब, पोपटी रंग, भरपूर आणि चविष्ट गराच्या असल्याने देशांतर्गत तसेच परदेशातही चांगली मागणी आहे.
  • कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाने भाग्या ही जात बारमाही उत्पादनासाठी विकसित केली आहे.
  • दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा ही जात विकसित केली आहे. या शेंगांची लांबी १.५ ते २ फूट असून शेंगा त्रिकोणी आकाराच्या असतात. पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी ३५ ते ४० किलो शेंगा मिळतात.

संपर्क : अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ , डॉ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११
(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...