agricultural news in marathi, fruit crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

आंबा, संत्रा, मोसंबी फळबाग सल्ला
डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी
शनिवार, 16 डिसेंबर 2017

सद्यस्थितीत पावसाळा संपल्याने फळबागेला योग्य पाणीव्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सिंचनासाठी शक्यतो ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ते शक्य नसल्यास झाडाभोवती आळे करून त्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. त्यामुळे अतिरिक्त सिंचनही होणार नाही; तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापनही होईल.

आंबा :

सद्यस्थितीत पावसाळा संपल्याने फळबागेला योग्य पाणीव्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सिंचनासाठी शक्यतो ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ते शक्य नसल्यास झाडाभोवती आळे करून त्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. त्यामुळे अतिरिक्त सिंचनही होणार नाही; तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापनही होईल.

आंबा :

  • नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा. वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी कलमांना सावली करावी.
  • नवीन लागवड केलेल्या कलमांभोवती आळे तयार करावे. जमिनीतून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी काडीकचरा किंवा वाळलेले गवत यांचे आच्छादन करावे.
  • जमिनीच्या मगदूरानुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

संत्रा, मोसंबी :

  • मृगबहर धरलेल्या बागेस जमिनीच्या मगदुरानुसार १२ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना दुहेरी बांगडी पद्धतीने आळे करुन पाणी द्यावे. किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • आंबे बहर धरण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करुन घ्यावी. प्रत्येक झाडास चांगले कुजलेले शेणखत ४०-५० किलो व स्फुरद ४०० ग्रॅम, पालाश ४०० ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी. स्फुरद व पालाश या खतांची मात्रा दुपारी पडलेल्या झाडाच्या सावलीच्या बाहेर कुदळीने गोल खोदून द्यावी. खत टाकून झाल्यावर मातीने झाकावे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बागेस हलके पाणी द्यावे.
  • झाडाच्या खोडाजवळ नांगरट करताना अत्यंत वर-वर नांगर चालेल अशापद्धतीने करावी. खोलवर नांगरटी केल्यास झाडाची मुळे तुटतात. तसेच आंतरमशागत करताना झाडाचे खोड किंवा फांद्यांना इजा पोचणार नाही याची काळजी घ्यावी.

संपर्क : ०२४५२-२२९०००
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...