agricultural news in marathi, fruity vegetables crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

फळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला
सी. बी. बाचकर, एस. ए. पवार, डॉ. एम. एन. भालेकर
बुधवार, 30 मे 2018

सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी या किडी तर पानावरील करपा, फळसड व बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी या किडी तर पानावरील करपा, फळसड व बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

मिरची
मिरचीवरील चुरडा-मुरडा (लीफ कर्ल)
हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या रसशॉोषक किडींमार्फत होतो.
कीड नियंत्रण
पांढरी माशी
पिकात एकरी १२ पिवळे चिकट सापळे लावावेत.
फुलकिडे
एकरी १२ निळे चिकट सापळे वापरावेत.
फवारणी प्रतिलिटर पाणी
वेळ - प्रादुर्भाव दिसताच  
फिप्रोनील (५ ई.सी.) १.५ मि.लि.  
फेनपायरॉक्झिमेट (५ इ.सी.) १ मि.लि. किंवा
फेनाक्झाक्विन (१० इ.सी.) २ मि.लि.

रोग नियंत्रण
पानावरील ठिपके
हा रोग सरकोस्पोरा व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होतो. दोन्ही बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यांमार्फत होतो.
सरकोस्पोरा : या बुरशीमुळे पानावर गोलाकार, लहान डाग दिसून येतात. डागांचा मध्यभाग फिकट सफेद आणि कडा गर्द तपकिरी असतात. या रोगाला फ्रॉग आय लिफ स्पॉट असेही म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने पिवळी पडून गळतात. पानगळ झाल्यामुळे फळे उघडी पडून सौरउष्णतेमुळे फळांवर पांढरे चट्टे पडतात.
अल्टरनेरिया सोलॅनी : या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे आकारहीन डाग पानांवर दिसतात. या डागामध्ये एकात एक अशी गोलाकार वलये असतात. असे लहान डाग एकमेकात मिसळून मोठे चट्टे होतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून पानाची पूर्ण वाढ होण्याअगोदर करपतात आणि पानगळ होते.
नियंत्रण फवारणी प्रतिलिटर पाणी  
वेळ : रोगाची लक्षणे दिसताच
मॅंकोझेब २.५ ग्रॅम  किंवा
कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा
क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम  

वांगी :
वांगी पिकावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी व पांढरीमाशी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.

एकात्मिक कीड नियंत्रण

 • कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकून नष्ट करावे.
 • तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
 • ल्युसील्यूर कामगंध सापळे एकरी ४० याप्रमाणात वापरावेत व तसेच त्यातील ल्यूर दोन महिन्यांनी बदलावा.
 • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकरी १२ पिवळे चिकट सापळे वापरावेत.
 • अधून-मधून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
 • फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. किंवा क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एस.सी.) ०.४ मि.लि.
  सूचना : फवारणी नॅपसॅक पंपाने करावी.

रोग नियंत्रण
पानावरील करपा व फळसड
रोगकारक बुरशी : फोमोप्सिस व्हेक्झान्स
लक्षणे : पाने व फळावर रोग आढळून येतो. रोगामुळे करड्या ते तपकिरी रंगाचे गोलाकार ते लंबाकृती डाग पानांवर व फळांवर दिसून येतात. फळावर खोलगट तपकिरी- काळसर, वलयांकित डाग दिसून येतात व फळे सडतात.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी, वेळ - रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि.

बोकड्या किंवा पर्णगुच्छ
रोगकारक बुरशी : फायटोप्लाझमा
लक्षणे : रोगामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने लहान आकाराची,मऊ, पातळ, पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत. रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो.
नियंत्रण :

 • वांगी कुळातील तणांचा नायनाट करावा.
 • लागवड करताना रोपे १००० पीपीएम (१ ग्रॅम/ लिटर पाणी) स्ट्रेप्टोमायसिनच्या  द्रावणात बुडवून लावावीत. त्याचप्रमाणे पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांपासून दर १५-२० दिवसांच्या अंतराने स्ट्रेप्टोमायसिन (१-१.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी)ची फवारणी करावी.
 • लागवडीनंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क (५ टक्के) फवारावा.

संपर्क : सी. बी. बाचकर, ०२४२६-२४३३४२
(अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...