agricultural news in marathi, gel converts itself into cell like shape , Agrowon, Maharashtra | Agrowon

जिवंत पेशीप्रमाणे योग्य आकार मिळविणारे जेल विकसित
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कार्नेगी मेलन विद्यापीठातील संशोधकांनी जिवंत स्नायूप्रमाणे योग्य दिशेने वाढू शकण्याची क्षमता असलेल्या जेलचा शोध लावला आहे. हे जेल त्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे आकार निर्माण करेल. या नव्या संशोधनामुळे स्नायू अभियांत्रिकी आणि लवचिक रोबोटिक्स या शाखांमध्ये नव्या शक्यता निर्माण होणार आहेत. हे संशोधन ‘प्रोसिंडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले असून, त्याच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे.

सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कार्नेगी मेलन विद्यापीठातील संशोधकांनी जिवंत स्नायूप्रमाणे योग्य दिशेने वाढू शकण्याची क्षमता असलेल्या जेलचा शोध लावला आहे. हे जेल त्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे आकार निर्माण करेल. या नव्या संशोधनामुळे स्नायू अभियांत्रिकी आणि लवचिक रोबोटिक्स या शाखांमध्ये नव्या शक्यता निर्माण होणार आहेत. हे संशोधन ‘प्रोसिंडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले असून, त्याच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे.

हायड्रोजेलमध्ये त्याच्या आकारापेक्षा अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांचा वापर कृषिक्षेत्रामध्ये रोपांच्या मुळाशेजारी पाणी धरून ठेवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. त्याच प्रमाणे या हायड्रोजेलचा वापर स्नायू अभियांत्रिकी आणि लवचिक रोबोटिक्स क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात होतो.
निसर्गामध्ये एखादी पेशी ज्याप्रमाणे स्वतःची वाढ करतानाच अपेक्षित अशा स्नायूंचा आकार धारणे करते. या रचनेची नक्कल करणारे हायड्रोजेल सिंगापूर येथील  कार्नेगी मेलन विद्यापीठातील संशोधक चांगजिन हुयांग, डेव्हिड क्विन, के. जिम्मी हसिया आणि नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाची अध्यक्ष प्रो. सुब्रा सुरेश यांच्या संशोधनातून विकसित करण्यात आले आहे. यातील ऑक्सिजनच्या तीव्रतेमध्ये योग्य बदल केला असून, त्यामुळे योग्य आकार घेण्यासोबतच वाढीच्या वेगावर आवश्यक तिथे नियंत्रण आणण्याचे कामही केले जाते. या प्रक्रियेमुळे हायड्रोजेल अपेक्षित असा त्रिमितीय आकार प्राप्त करते.

अनेक संभाव्य शक्यता...
हे तंत्रज्ञान पूर्वीच्या थ्री डी प्रिंटिंग तंत्रापेक्षा वेगळे आहे. नव्या हायड्रोजेल तंत्रज्ञानामध्ये अंतर्गत पातळीवर बदल करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान कृत्रिम स्नायूंच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्याविषयी माहिती देताना प्रो. सुब्रा सुरेश म्हणाले, की हायड्रोजेल तंत्रज्ञानामध्ये स्ववाढीसोबतच संरचनेमध्ये उच्च नियंत्रण शक्य आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि रोबोटिक्स क्षेत्रामध्ये त्याचे अनेक फायदे होणार आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...