गादीवाफ्यावर करा आले लागवड

आले लागवड तंत्रज्ञान
आले लागवड तंत्रज्ञान

आले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे . आल्याची लागवड १५ मे ते १० जून या कालावधीत  तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान करावी.  मात्र ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असताना लागवड केल्यास उगवणक्षमता कमी होते, मंदावते किंवा बेणे उष्णतेमुळे खराब होऊन जाते. काही वेळा उगवलेले आले पुढे जोम धरत नाही. एक महिना साठवणूक केलेल्या बेण्यातून प्रत्यक्ष लागवडीकरिता ३ ते ४ डोळे अंकुरलेले व ३५ ते ५० ग्रॅम वजनाचे तुकडे मोडून ,निवडून बेणे प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ दिवस अगोदर तयार करावे. उर्वरित बेणे बाजारात विकावे.

लागवड :

  • लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी.
  • लागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.
  • ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास ३ ते ४ तासांत एक एकर आले लागवड पूर्ण होते. त्यामुळे वेळ व मजुरी खर्चात बचत होते. परंतु, त्यासाठी लागवडी अगोदर रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घ्यावे. त्यावर तुषार सिंचनाने पाणी देऊन जमीन वाफसा स्थितीत आणावी. त्यानंतर लागवड यंत्राच्या सहाय्याने चार फुटाचे गादीवाफे निर्मिती आणि लागवड एकाच वेळी करावी. त्यानंतर चार फुटांवर ठिबक लॅटरल जोडून पाणी द्यावे.
  • पाणी व्यवस्थापन :

  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. पाणी, मजुरी खर्च बचत होऊन विद्राव्य खताची मात्रा सहज देता येते.
  • जमीन जर हलकी असेल तर ३० सें.मी. अंतर आणि जमीन जर जमीन मध्यम ते भारी असेल तर ४० सें.मी. अंतरावरील ४ लिटर डिस्चार्ज असलेले इनलाइन ड्रिपर निवडावेत.
  • गादीवाफ्याची लांबी १५० ते २०० फूट असेल तर १६ एम.एम. व्यासाची लॅटरल आणि वाफ्यांची लांबी २०० फुटांपेक्षा जास्त असेल तर २० एम.एम. व्यासाची लॅटरल निवडावी.
  • लागवड जर १५ ते ३० मे दरम्यान केली तर ठिबक सिंचनाबरोबरच सूक्ष्म तुषार संच सुरवातीला दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरू ठेवावा. म्हणजे लागवड क्षेत्रामधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. बेण्याची उगवण लवकर होते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर हा सूक्ष्म तुषार संच वापरणे बंद करावे.
  • बेणे साठवणूक

  • बेणे थंड, कोरड्या, हवेशीर, सावलीच्या जागेत साठवून ठेवावे. साठवणूक करताना प्रथम ६ इंच जाडीचा वाळू किंवा विटांचा चौथरा करून घ्यावा. त्यावर ६ इंच जाडीचा कडुलिंबाचा पाला अंथरावा. त्यावर कार्बेन्डाझिम ५० ग्रॅम, निंबोळी पावडर ५० ग्रॅम पसरून टाकावी. त्यावर १ फूट जाडीचा बेण्याचा थर द्यावा. त्यावर पुन्हा वरीलप्रमाणे कडुलिंब पाला, कार्बेन्डाझिम भुकटी,  निंबोळी पावडर पसरावी. असे एकावर एक थर द्यावेत. साधारणतः ४ फूट उंचीचा बियाण्याचा ढीग करून ठेवावा. त्यावर शेवटी कडुलिंबाचा पाला पसरून त्यावर गोणपाट टाकून ढीग झाकून ठेवावा. त्यामध्ये हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी.
  • बीज प्रक्रिया रासायनिक बीजप्रक्रिया निवड केलेल्या बेण्यास लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी प्लॅस्टिक ड्रममध्ये १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १०० मि.लि. क्विनॉलफॉस प्रति १०० लिटर पाण्यात चांगले मिसळून द्रावण तयार करावे. त्यात १५ मिनिटे निवडलेले बेणे बुडवून ठेवावे. त्यानंतर बेणे निथळून सावलीत सुकू द्यावे. जैविक बीजप्रक्रिया दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ ते २ तास अगोदर बेण्यास जैविक बीजप्रक्रिया करावी. याकरिता ५०० मि.लि.किंवा ५०० ग्रॅम पी.एस.बी., ५०० मि.लि. किंवा ५०० ग्रॅम ॲझोस्पिरीलियम जिवाणू संवर्धक आणि ५०० ग्रॅम गूळ प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवडीकरिता वापरावे.

     संपर्क : अंकुश सोनावले ९४२०४८६५८७ (कृषी सहायक, नागठाणे, जि. सातारा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com