agricultural news in marathi, implements based ony, Agrowon, Maharashtra | Agrowon

सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..
कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
मंगळवार, 1 मे 2018

सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य आर्द्रतेपर्यंत सुकविणे आवश्‍यक असते. यासाठी अनेक प्रकारांमध्ये सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) उपलब्ध आहे. वरती धुराडे असलेला कॅबिनेट ड्रायर विविध पिकांसाठी उपयोगी ठरतो.
सौर फोटोव्हेल्टाइक पंप : नदी, नाले किंवा विहिरी इत्यादी स्रोतांपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. सौर पंप प्रणालीमध्ये १) सौर फोटोव्होल्टाइक मॉड्युल पॅनेल, २) विद्युतभार कंट्रोलर, ३) प्रत्यावर्ती (डी. सी.) पंप, ४) पाइप असे चार मुख्य भाग असतात.

सौर पंप प्रणालीमध्ये फोटोव्होल्टाइक मॉड्युल हा मुख्य भाग असून, यामध्ये अनेक सौर मॉड्युल एकमेकांना पंपाच्या शक्तीनुसार जोडलेले असतात. सौर प्रत्यावर्ती पंप सकाळी ८.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास विनातक्रार कार्य करतात.
सौर पंप उपयोगामध्ये नसताना सौर बॅटरी चार्जिंग प्रणालीद्वारा बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोग करता येतो. विद्युतभारित बॅटरीद्वारा कन्व्हर्टर वापरून विविध विद्युत उपकरणे वापरता येतात.
सौर घरगुती दिवे : वीजनिर्मितीसाठी सौर पॅनेलचा उपयोग होतो. सौर पॅनेलची काच विशिष्ट प्रकारची असल्यामुळे सहज फुटत नाही. त्यामुळे सौर पॅनेलची विशिष्ट निगा ठेवावी लागत नाही. हे संच तीन वॉट ते ७५ वॉट या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. विजेच्या मागणीप्रमाणे पॅनेलच्या संचाची संख्या ठरविली जाते.

संपर्क : ०२३५८-२८२४१४
कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान
महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी

इतर इंधन शेती
ऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रणसद्यस्थितीत उसाच्या लागवडी संपल्या आहेत. विविध...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती द्यावी.सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
तंत्र कोळसा उत्पादनाचे...कार्बनच्या प्रमाणावर कोळशाचे औष्णिक मूल्य ठरते....
जमीन सुधारणेसाठी ‘बायोचार’ ठरले फायदेशीरशेतातील टाकाऊ पदार्थांवर ऑक्सिजनविरहित वातावरणात...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
वाया शेतमालापासून स्वस्तात इथेनॉल...उत्तराखंडमधील काशीपूर येथे नुकतीच शेतीमधील वाया...