चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित

चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित

चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे. चीनमधील पोषकता सोसायटीने २०१६ मध्ये नूतनीकरण केलेल्या आहारविषयक सूचनांमध्ये प्रौढ व्यक्तीच्या आहारामध्ये ३०० ग्रॅम (१०.६ आऊन्स) डेअरी उत्पादने प्रति दिन वापरण्याची सूचना केली आहे. सध्या हा वापर केवळ १०० ग्रॅम प्रति प्रौढ व्यक्ती इतका कमी आहे. म्हणजेच डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत जाणार असल्याचा अंदाज मिंटेल कंपनीतील अन्न आणि पेय विश्लेषक लॉरीस ली यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून, कुटुंबाच्या आर्थिक मिळकतीमध्येही वाढ झाली आहे. या सर्व घटकांचा चांगला परिणाम डेअरी उत्पादनांच्या मागणीवर पडणार आहे.

  • अंदाजानुसार चीज, योगर्ट, पूरक प्रथिने या उत्पादनांमध्ये मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी उद्योगासाठी हीच बाजारपेठ खुली असू शकेल.
  • गेल्या वर्षी चीनमध्ये विक्री झालेल्या अमेरिकी चीजचे प्रमाण आधीच्या तुलनेमध्ये ४४ टक्क्याने वाढले आहे.
  • योगर्टमध्ये तुलनेने उशिरा तेजी येत असली तरी एकूण कल चढता आहे.
  • अधिक प्रथिनांचे प्रमाण असलेल्या उत्पादनांच्या मागणीमध्येही वाढ नोंदवली आहे.
  • चीनमध्ये दूध आणि प्रक्रिया उत्पादन होत असले तरी अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयात केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपले मूळ दूध स्रोत उत्पादनावर नोंदवण्यास सुरवात केल्याचे दिसते. उदा. ऑस्ट्रेलियातून आयात, न्यूझीलंडमधून आयात. त्याला शह देण्यासाठी चीनमधील दूध उत्पादकांनी चायनीज फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे प्रति माह तपासणी सुरू केली आहे. त्या तपासणीमध्ये ९९.५ टक्के नमुने चांगले असल्याचे हॉंगकॉंग डेटा अँड बिझनेस इंटेलिजन्स फर्म सीसीएम यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादनावरील विश्वासामध्ये वाढ झाली आहे. २००८ मधील विश्वासाचे प्रमाण ५० टक्के होते, त्यात वाढ होऊन गेल्या वर्षी ७५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अर्थात अद्यापही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश चीनसाठी सर्वात मोठे व विश्वासार्ह निर्यातदार आहेत.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com