agricultural news in marathi, increase in demand for dairy products in china, Agrowon, Maharashtra | Agrowon

चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे.

चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति वर्षी ६ ते ७ टक्के दराने वाढ होत आहे. डेअरी उत्पादनामध्ये प्रामुख्याने चीज, योगर्ट आणि पूरक प्रथिनांची मागणी अधिक असल्याचा अहवाल मिंटेल या सर्वेक्षण कंपनीने दिला आहे.
चीनमधील पोषकता सोसायटीने २०१६ मध्ये नूतनीकरण केलेल्या आहारविषयक सूचनांमध्ये प्रौढ व्यक्तीच्या आहारामध्ये ३०० ग्रॅम (१०.६ आऊन्स) डेअरी उत्पादने प्रति दिन वापरण्याची सूचना केली आहे. सध्या हा वापर केवळ १०० ग्रॅम प्रति प्रौढ व्यक्ती इतका कमी आहे. म्हणजेच डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत जाणार असल्याचा अंदाज मिंटेल कंपनीतील अन्न आणि पेय विश्लेषक लॉरीस ली यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून, कुटुंबाच्या आर्थिक मिळकतीमध्येही वाढ झाली आहे. या सर्व घटकांचा चांगला परिणाम डेअरी उत्पादनांच्या मागणीवर पडणार आहे.

  • अंदाजानुसार चीज, योगर्ट, पूरक प्रथिने या उत्पादनांमध्ये मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय डेअरी उद्योगासाठी हीच बाजारपेठ खुली असू शकेल.
  • गेल्या वर्षी चीनमध्ये विक्री झालेल्या अमेरिकी चीजचे प्रमाण आधीच्या तुलनेमध्ये ४४ टक्क्याने वाढले आहे.
  • योगर्टमध्ये तुलनेने उशिरा तेजी येत असली तरी एकूण कल चढता आहे.
  • अधिक प्रथिनांचे प्रमाण असलेल्या उत्पादनांच्या मागणीमध्येही वाढ नोंदवली आहे.
  • चीनमध्ये दूध आणि प्रक्रिया उत्पादन होत असले तरी अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयात केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपले मूळ दूध स्रोत उत्पादनावर नोंदवण्यास सुरवात केल्याचे दिसते. उदा. ऑस्ट्रेलियातून आयात, न्यूझीलंडमधून आयात. त्याला शह देण्यासाठी चीनमधील दूध उत्पादकांनी चायनीज फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे प्रति माह तपासणी सुरू केली आहे. त्या तपासणीमध्ये ९९.५ टक्के नमुने चांगले असल्याचे हॉंगकॉंग डेटा अँड बिझनेस इंटेलिजन्स फर्म सीसीएम यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक दूध उत्पादनावरील विश्वासामध्ये वाढ झाली आहे. २००८ मधील विश्वासाचे प्रमाण ५० टक्के होते, त्यात वाढ होऊन गेल्या वर्षी ७५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अर्थात अद्यापही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश चीनसाठी सर्वात मोठे व विश्वासार्ह निर्यातदार आहेत.
     
टॅग्स

इतर कृषिपूरक
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...
दुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...
दुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...
टंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...
योग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...
पोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...
शेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...
कुक्कुटपालन सल्ला कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध...
बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात...जनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य...
योग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन...जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना...
गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रेजास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध...
खाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८...निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे...
शेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची...अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत...
शेळ्यांना आहे वर्षभर मार्केटसांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली)...
रेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता...
वेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे...आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक...
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वंधत्व...जनावरातील वंधत्वामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन...
स्वच्छता, लसीकरणातून कमी करा शेळ्यांतील...शेळ्यांची सर्वात जास्त काळजी पावसाळ्यामध्ये...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...