agricultural news in marathi, increasing awareness for personal care for cancer treatment , Agrowon, Maharashtra | Agrowon

कर्करोगाच्या वैयक्तिक उपचाराकडे वाटचाल सुरू
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सिंगापूर येथील संशोधकांनी २९ पेशीबाह्य जनुकांचे एक पॅनेल ओळखले आहे. त्यावरून फुफ्फुसाच्या कर्करोगांच्या रुग्णांच्या औषधोपचाराला असणाऱ्या प्रतिक्रियांचा अंदाज मिळू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यामुळे रुग्णनिहाय औषधोपचार पद्धती वापरणे व त्याचे धोके कमी करणे शक्य होईल. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सिंगापूर येथील संशोधकांनी २९ पेशीबाह्य जनुकांचे एक पॅनेल ओळखले आहे. त्यावरून फुफ्फुसाच्या कर्करोगांच्या रुग्णांच्या औषधोपचाराला असणाऱ्या प्रतिक्रियांचा अंदाज मिळू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यामुळे रुग्णनिहाय औषधोपचार पद्धती वापरणे व त्याचे धोके कमी करणे शक्य होईल. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग हे स्त्रिया आणि पुरुषांच्या जिवाला धोका व मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या रोगांमध्ये येतो. या रोगाच्या उपचाराला प्रारंभ करण्यापूर्वी केमिओथेरपीसारख्या पद्धतीचा अवलंब केला जातो. अशा उपचारांना रुग्ण कशा प्रकारे प्रतिसाद देतो, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पारंपरिक पद्धतीमध्ये सर्वांसाठी एकच उपचार प्रणालींचा वापर होतो. मात्र, दोन माणसांना जरी एकाच प्रकारचा कॅन्सर (कर्करोग) झाला, तरी कर्करोगांंच्या पेशींची वाढ, त्यांच्या पसरण्याचा वेग हा वेगवेगळा असल्याचे  सिंगापूर येथील राष्ट्रीय विद्यापीठातील प्रो. लिम चिवी टेक यांनी सांगितले.    

रुग्णनिहाय उपचार प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने लिम आणि त्यांचे सहकारी संशोधन करीत आहेत. त्यांना जनुकीय माहिती साठ्यातून फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्यान्वित होणाऱ्या पेशींचा (एक्स्ट्रासेल्युलर मॅिट्रक्स -इसीएम) शोध लागला. त्यातील २९ इसीएम घटक रोगाचे निदान आणि वाढीविषयी बायोमार्कर म्हणून उपयुक्त ठरू शकतात. २००० पेक्षा अधिक फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये असलेल्या रुग्णांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या. या जनुकांच्या कार्यामुळे केमाेथेरपीच्या यशाचा दराचा अंदाज मिळतो, हे लक्षात आले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...