ची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी क्रांतीनंतर आर्थिक धोरण निश्चित करताना रशियाचा कित
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते.
मत्स्यशेती करण्यापूर्वी आपल्याकडील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाचा अंदाज घ्यावा. मत्स्यशेतीच्या विविध पद्धती आहेत. आपल्या क्षमतेनुसार मत्स्यपालनाच्या पद्धतींची निवड करावी.
एकजातीय मत्स्यसंवर्धन ः

- या प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.
- या पद्धतीमध्ये तलावाचा आकार ०.२ ते १ हेक्टर एवढा असतो.
- एकजातीय मत्स्यसंवर्धन
- या प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.
- या पद्धतीमध्ये तलावाचा आकार ०.२ ते १ हेक्टर एवढा असतो.
एकत्रित मत्स्यसंवर्धन
- या प्रकारामध्ये दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते. या प्रकारात आपल्याकडील तलावातील उपलब्ध जास्तीत जास्त घटकांचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला जातो. पूर्वी फक्त भारतीय कार्प माशांचे एकत्रित संवर्धन होत होते; परंतु आता चायनीज कार्पचे बीज उपलब्ध असल्याने त्यांचेही एकत्रित संवर्धन केले जाते.
- या संवर्धनामध्ये तीनही थरांमधील माशांचे संवर्धन केल्यास तीनही थरांमधील तलावातील उपलब्ध अन्नाचा वापर होतो, शिवाय तलावामध्ये शेवाळ किंवा वनस्पती असतील, तर गवत्या मासा त्यांना खातो.
मिश्र मत्स्यसंवर्धन
- या प्रकारच्या संवर्धनामध्ये भारतीय व चायनीज कार्पबरोबर गोड्या पाण्यातील कोळंबीचे (पोचा कोळंबी/ झिंगा) संवर्धन केले जाते.
- कोळंबी खालच्या थरात राहत असल्याने खाद्य व वावरण्यासाठी जागा यासाठी स्पर्धा होऊ शकते म्हणून मृगल व कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करू शकत नाही.
- या पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तलावाचा आकार ०.५ ते ५ हेक्टर एवढा असतो.
संपर्क : ०२३५२- २३२२४१
(मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी )
- 1 of 5
- ››