agricultural news in marathi, information about solar tunnel , Agrowon, Maharashtra | Agrowon

सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती द्यावी.
डॉ. सुरेंद्र काळबांडे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळविण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.
सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.
२५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.
टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनविलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.

अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.
सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा ‘ग्रीन हाउस इफेक्‍ट’मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.
वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो. ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.
या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.
संपर्क : डॉ. सुरेंद्र काळबांडे, ७५८८७६३७८७
(अपारंपरिक ऊर्जा स्रोत योजना,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

टॅग्स

इतर इंधन शेती
ऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रणसद्यस्थितीत उसाच्या लागवडी संपल्या आहेत. विविध...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती द्यावी.सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
तंत्र कोळसा उत्पादनाचे...कार्बनच्या प्रमाणावर कोळशाचे औष्णिक मूल्य ठरते....
जमीन सुधारणेसाठी ‘बायोचार’ ठरले फायदेशीरशेतातील टाकाऊ पदार्थांवर ऑक्सिजनविरहित वातावरणात...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
वाया शेतमालापासून स्वस्तात इथेनॉल...उत्तराखंडमधील काशीपूर येथे नुकतीच शेतीमधील वाया...