कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.

कोरफड
कोरफड

स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.

लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. दोन वर्षांपासून सतत पाच वर्षे हेक्‍टरी ४० टन मांसल पानांचे उत्पादन मिळते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. वाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. वाळा (खस) गवताची जमिनीची धूप थांबविण्यासाठी लागवड करतात. वाळा हे बहुवार्षिक गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतू-मुळे असून, ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी, ३० ते ९० सें.मी. लांब असून, रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. हलक्‍या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळांची चांगली वाढ होत असून, मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. जून, जुलैमध्ये ६० ते ७५ सें. मी. अंतरावर सरी-वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (२ x ४ मीटर) सपाट वाफे तयार करावेत. ७५ x ३० सें. मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीसाठी के. एस.- १, के. एस.- २ व सुगंधा या जाती निवडाव्यात.

संपर्क : ०२४२६ - २४३२९२, (औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com