agricultural news in marathi, information regarding medicinal plant plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon

कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.
औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.

स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.

लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. दोन वर्षांपासून सतत पाच वर्षे हेक्‍टरी ४० टन मांसल पानांचे उत्पादन मिळते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
वाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. वाळा (खस) गवताची जमिनीची धूप थांबविण्यासाठी लागवड करतात.
वाळा हे बहुवार्षिक गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतू-मुळे असून, ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी, ३० ते ९० सें.मी. लांब असून, रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. हलक्‍या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळांची चांगली वाढ होत असून, मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. जून, जुलैमध्ये ६० ते ७५ सें. मी. अंतरावर सरी-वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (२ x ४ मीटर) सपाट वाफे तयार करावेत. ७५ x ३० सें. मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीसाठी के. एस.- १, के. एस.- २ व सुगंधा या जाती निवडाव्यात.

संपर्क : ०२४२६ - २४३२९२,
(औषधी व सुगंधी वनस्पती योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी, जि. नगर)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर औषधी वनस्पती
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...
कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
तंत्र शिंगाडा उत्पादनाचे...शिंगाडा हे उपवासाच्या काळात विशेष मागणी असलेले...
निवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...
पित्तशामक कोकमकोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय...
अडुळसा लागवड कशी करावी?अडुळसा लागवड  अडुळसा हे सदैव हिरवेगार...
अाैषधी म्हणूनही उपयुक्त मिरे, वेलचीस्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी,...त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी...