agricultural news in marathi, information regarding solar dryer , Agrowon, Maharashtra | Agrowon

सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा स्रोत योजना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
गुरुवार, 31 मे 2018

सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे. २५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.

टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉंक्रीटचा बनविलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.

सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

सोलर टनेल ड्रायर अर्ध दंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे. २५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.

टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट कॉंक्रीटचा बनविलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.

अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.
सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा ''ग्रीन हाऊस इफेक्‍ट''मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.

वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.
ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.

या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.

सोलर टनेल ड्रायरची वैशिष्ट्ये
ड्रायरची आवश्‍यकतेनुसार विविध आकारांची संरचना करता येते.
सोलर टनेल ड्रायर पूर्व-पश्‍चिम दिशेस बांधावा.
स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यातून तयार करता येतो.

संपर्क : डॉ. सुरेंद्र काळबांडे, ७५८८७६३७८७
(अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा स्रोत योजना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
 

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
पानवेल लागवड पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन...
नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत....
अशी करतात कणगर लागवडकणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व...
अशी करा ॲस्टर लागवड ॲस्टर लागवडीचे नियोजन करताना हंगाम, जातींची निवड...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
कोरफड लागवड स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
नेपिअर गवताची लागवडसं करित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रणसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
दालचिनी, लवंग लागवडदालचिनी लागवड दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून...