खाद्यपदार्थांच्या अधिक अचूक विश्लेषणासाठी एकत्रित पद्धती विकसित

खाद्यपदार्थांच्या अधिक अचूक विश्लेषणासाठी एकत्रित पद्धती विकसित
खाद्यपदार्थांच्या अधिक अचूक विश्लेषणासाठी एकत्रित पद्धती विकसित

आपण खात असलेल्या खाद्यामधील नेमक्या पोषकतत्त्वाचे प्रमाण समजण्यासाठी अमेरिकेतील कृषी संशोधन सेवेतील रसायनतज्ज्ञ क्रेग बॅर्डवेल यांनी विश्लेषणाच्या काही पद्धती विकसित केल्या आहेत. खाद्य नमुन्यातील एकाच वेळी सात वेगवेगळ्या उपकरणांद्वारे अचूक विश्लेषण केले जाते. त्यामुळे वेळेमध्ये बचतीसोबतच अधिक अचूकता मिळते.  

खाद्यपदार्थांतील पोषक घटकांचे प्रमाण माहीत असणे ही आहाराच्या नियोजनासाठी अत्यंत आवश्यक असते. अनेक खाद्यपदार्थामध्ये त्यात उपलब्ध नसलेले अन्य एखादे जीवनसत्त्व मिसळले जाते. उदा. अलीकडे दूध, नाष्ट्यासाठीचे फ्लेक्स, संत्र्याचा रस, योगर्ट, मार्गारीन आणि सोयाबीनवर आधारित पेये यामध्ये दात आणि हाडांच्या बळकटीकरणासाठी ड जीवनसत्त्वाचा वापर केला जातो. अशा प्रत्येक घटकाचे नेमके प्रमाण जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या उपकरणाचा वापर करावा लागतो. बेल्ट्सव्हिले येथील अन्न संरचना आणि पद्धती विकास प्रयोगशाळेतील विश्लेषक रसायनतज्ज्ञ असलेल्या क्रेग बॅर्डवेल यांनी नव्या पद्धत तयार केली आहे. त्यात त्यांना चार मास स्पेक्ट्रोमीटर, एक गॅस आणि दोन लिक्विड क्रोमोटोग्राफ अशा सात विश्लेषक यंत्राचा वापर केला आहे.

नेमक्या प्रमाणाची आवश्यकता : प्रमाणित विश्लेषण पद्धतीमध्ये खाद्यपदार्थांचे नमुने अतिनील किरणांच्या संपर्कात ठेवले जातात. त्यामुळे पदार्थातील मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी जीवनसत्त्वे, खनिजे, मेदाम्ले यांचे प्रमाण समजते. मात्र, अनेक वेळा त्याची अचूकता कमी राहत असल्याचे बॅर्डवेल यांनी सांगितले. त्यामुळे मुलद्रव्यीय पातळीवर जाऊन विश्लेषण करण्याची आवश्यकता भासते. अशा विश्लेषणातून पोषक घटकांची मूलद्रव्यीय संरचना, आयसोमर मिळवली जाते. आयसोमर म्हणजे रासायनिक सूत्र सारखे असले तरी त्यांची संरचना वेगळी असणारी मूलद्रव्ये होत. त्यामुळे पोषक घटकांची रचनानुसार त्यांच्या शरीरातील शोषणाचे प्रमाण ठरत असल्याचे ही अत्यंत महत्त्वाची ठरतात.   संशोधनाचे फायदे बॅर्डवेल यांनी दीर्घ संशोधनातून विविध खाद्यपदार्थांतील प्रमाणाविषयी असलेल्या धारणा चुकीच्या असल्याचे दाखवून दिले आहे. उदा. कालवातील (ओयस्टर)मधील ड जीवनसत्त्वाचे प्रमाण. त्यांनी फिश ऑइल आणि लॅनोलिनमधील ड जीवनसत्त्वामध्ये असलेले फरक दाखवले. तसेच विविध पेये, भाज्याचे रस आणि सोयाबीन तेल यांतील पूरक पोषक घटकांचे नेमके प्रमाण मिळवले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com