agricultural news in marathi, interactions in essential elements, agrowon, maharashtra | Agrowon

पीक पोषणामध्ये अन्नद्रव्यांच्या परस्पर क्रियांचे महत्त्व
डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. विलास पाटील, डॉ. महेश देशमुख
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा व त्यांचे प्रमाण हे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच इतर घटकांचा शोषणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असते. शोषणाचा वेग, मुळांनी अन्नद्रव्ये शोषण केल्यावर मुळाकडून पानापर्यंत होणारी अन्नद्रव्यांची गतिमानता आणि गरज असलेल्या भागात पाोचल्यावर तेथे होणारे कार्य हे अन्नद्रव्ये शोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा व त्यांचे प्रमाण हे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच इतर घटकांचा शोषणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असते. शोषणाचा वेग, मुळांनी अन्नद्रव्ये शोषण केल्यावर मुळाकडून पानापर्यंत होणारी अन्नद्रव्यांची गतिमानता आणि गरज असलेल्या भागात पाोचल्यावर तेथे होणारे कार्य हे अन्नद्रव्ये शोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

पीक पोषणात समतोल अन्नद्रव्यांचे महत्त्व लक्षात घेता, पिकास लागणारी सर्व आवश्यक अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. पिकास एकूण सतरा अन्नद्रव्यांची गरज असते. या सर्व अन्नद्रव्यांचे संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा व त्यांचे प्रमाण हे जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच इतर घटकांचा शोषणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असते. शोषणाचा वेग, मुळांनी अन्नद्रव्ये शोषण केल्यावर मुळाकडून पानापर्यंत होणारी अन्नद्रव्यांची गतिमानता व गरज असलेल्या भागात पोचल्यावर तेथे होणारे कार्य या सगळ्या गोष्टी अन्नद्रव्ये शोषणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. यातील प्रत्येक क्रियांवर अन्नद्रव्यांचा एकमेकांतील परस्परक्रियांचा भरीव परिणाम होतो. या परस्परक्रिया निरनिराळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जशा होतात, तशाच त्या मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्यातही होतात. या प्रक्रिया जमिनीत होतात, त्याचबरोबरीने त्या पिकातही होतात.
पिकांच्या अन्नद्रव्य शोषणाच्या दृष्टीने एका अन्नद्रव्याचा दुस­ऱ्या अन्नद्रव्यावर अनुकूल किंवा अनिष्ट परिणाम होतात, याला अन्नद्रव्यातील परस्परक्रिया म्हणतात.
उदा. एका अन्नद्रव्याबरोबर दुसरे अन्नद्रव्य निरनिराळ्या प्रमाणात एकाच वेळी वापरले असतात, पिकांकडून त्यास भिन्न-भिन्न प्रतिसाद मिळतो. दोन अन्नद्रव्ये अशा त­ऱ्हेने एकाच वेळी वापरली असता पिकाकडून मिळणारा प्रतिसाद वाढू शकतो किंवा त्यात खूप घटही येऊ शकते. उदा. जस्त व स्फुरद अन्नद्रव्यांचा एकेरी वापर केला असता जो प्रतिसाद मिळतो त्याची बेरीज ही जस्त व स्फुरद अन्नद्रव्य एकाच वेळी विशिष्ट प्रमाणात मिसळून दिली असता मिळणा­ऱ्या एकूण प्रतिसादापेक्षा कमी असण्याची शक्यताही खूप असते.

जस्त आणि स्फुरद :

 • ही आंतरप्रक्रिया स्थूलमानाने चार स्वरूपात व्यक्त होते.
 • जस्त व स्फुरद यांच्यात जमिनीत होणारी परस्परक्रिया व त्यामुळे दोन्ही अन्नद्रव्यांची जमिनीत होणारी उपलब्धता कमी होते.
 • मुळांमधून पानांकडे जाण्याची जस्त अन्नद्रव्याची गतिशीलता खूप कमी होते.
 • पिकाचा स्फुरदाला मिळणारा वाढीतील प्रतिसाद वाढण्यास पिकाची पाने व वरचा कोवळा भाग यातील जस्ताचे प्रमाण कमी झाले, असे जाणवते.
 • वनस्पतीतील स्फुरदचे प्रमाण फार वाढल्यास वनस्पतीतील जस्त शोषणासाठी जैव रासयनिक प्रक्रिया थंडावतात. परिणामी  वनस्पतीत शैथील्य येते, वाढ खुंटते. ज्या जमिनीत जस्ताची उपलब्धता भरपूर आहे, त्या जमिनीत स्फुरद खताची मात्रा जादा प्रमाणात दिली तर त्या जमिनीतील पिकांच्या दृष्टीने जस्ताची कमतरता तीव्रपणे जाणवते. याच्या उलट जस्त अन्नद्रव्ये वाढत्या मात्राने जमिनीस दिल्यास त्या प्रमाणात स्फुरदाची उपलब्धता कमी होत नाही. जस्त व स्फुरद यातील विरोधी संबंध लक्षात न घेतल्यास पिकाचे उत्पादन घटण्याचा धोका संभावतो.

जस्त आणि लोह :

 • जमिनीत जस्ताची मात्रा कितीही असली किंवा जास्त अन्नद्रव्ये वरून दिले तर लोहांचे प्रमाण वाढते. लोह मात्रेबरोबर जस्ताची जमिनीत उपलब्धता कमी होत जाते.
 • पाणथळ जमिनीतील लोहाचे फेरिकमधून फेरस स्वरूपातील रूपांतरामुळे लोहाचा जस्तावरील परिणाम जास्त तीव्र होऊन जस्ताची कमतरता वाढते.
 • जमिनीत होणा­ऱ्या लोह व जस्त यातील विरोधी आंतरप्रक्रियेप्रमाणे पिकातही त्याचे परिणाम कटाक्षाने दिसून येतात. लोहाची मात्रा वाढवून दिल्याने पिकातील जस्ताचे शोषण कमी होते. अन्नद्रव्याची जमिनीतून होणारी उपलब्धता कमी झाली.

जस्त, लोह आणि स्फुरद :

 • जस्त व स्फुरद, जस्त व लोह आणि लोह व स्फुरद या जोडीने होणा­ऱ्या अन्नद्रव्यातील परस्पपरक्रियांमुळे जस्त, लोह व स्फुरद या तीनही अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता जशी कमी होते तसेच पिकाकडून होणारे त्यांचे शोषणही खूप कमी होते.
 • जस्ताचा लोह अन्नद्रव्यातील शोषणवरील अनिष्ट परिणाम स्फुरदाच्या अनुपस्थितीत आणखीच तीव्र होतो.

जस्त आणि तांबे :

 • जमिनीला तांबे अन्नद्रव्ये खतरूपाने दिले असता जमिनीतील जस्त अन्नद्रव्यांची उपलब्धता बरीच कमी होते. मात्र, जस्त अन्नद्रव्य वाढीव मात्राने जमिनीत दिल्यास तांबे, जस्त अन्नद्रव्यातील परस्परक्रिया सौम्य स्वरूपाची होते. त्यामुळे पिकाला काही प्रमाणात जस्त अन्नद्रव्य मिळत राहते.
 • जस्ताची मात्रा वाढीव स्वरुपात दिली तर तांबे अन्नद्रव्याचा जमिनीतील उपलब्धतेवर गंभीर स्वरूपाचा अनिष्ट परिणाम होत नाही.

लोह आणि स्फुरद :
जमिनीतील लोह अन्नद्रव्याची उपलब्धता ब­ऱ्याच मोठ्या प्रमाणात जमिनीतील उपलब्ध स्वरूपातील स्फुरदाच्या पातळीवर अवलंबून असते. शेवटी स्फुरदाची पातळी जास्त, त्या प्रमाणात लोह अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होत जाते.
ज्या वेळी जमिनीत लोह व स्फुरद या दोन्ही अन्नद्रव्यांची एकाच वेळी कमतरता असते, त्या वेळी दिलेल्या लोह व स्फुरदामुळे वरील परिणाम दिसेलच असे सांगता येत नाही.

लोह  आणि मंगल :
सर्वसाधारणपणे मंगलाच्या वाढीव मात्रेबरोबर लोहाचे शोषण कमी होत जाते. प्रत्यक्षात दिसणारा परिणाम हा लोह व मंगल यांच्या उपलब्धतेतील प्रमाणाच्या गुणांकावर अवलंबून असतो. हा गुणांक १:५ असताना दोन्ही अन्नद्रव्यांचे शोषण सरळपणे होण्याची शक्यता असते. गुणांक वाढला की मंगलाची कमतरता जाणवते. उलट गुणांक कमी झाला तर लोहाची कमतरता जाणवते.

लोह आणि गंधक :
गंधक वापरामुळे सर्व साधारणपणे जमिनीतील लोहाची उपलब्धता वाढते. लोह दिल्यामुळे होणा­ऱ्या वाढीपेक्षा गंधक दिल्याने होणारी वाढ जास्त असते.
लोह व गंधक ही दोन्ही अन्नद्रव्ये एकाच वेळी जमिनीस दिली तर लोहाची उपलब्धता १०० टक्के वाढू शकते.
ज्या जमिनीत लोहाची कमतरता आहे तिथे नुसते गंधक दिल्यानेसुद्धा लोहाच्या उपलब्धतेत भरपूर वाढ होते.
लोहाची उपलब्धता जमिनीत जसजशी वाढते तसतसे पिकाकडून लोहाचे शोषणही वाढते.
लोह व गंधकाचा एकमेकांवरील परस्पर क्रियाचा परिणाम दिसून येतो.

तांबे आणि स्फुरद :
स्फुरदाच्या वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी-कमी होत जाते.
तांब्याच्या वाढीव मात्रेमुळे स्फुरदाची उपलब्धताही काही थोड्या प्रमाणात कमी होते.

मंगल आणि स्फुरद :
सर्व साधारणपणे स्फुरदाच्या वापरामुळे मंगलाचे शोषण वाढते.
चुनखडीचे प्रमाण वाढल्यास मंगलाच्या प्रत्यक्ष शोषणात घट होत जाते. परंतु स्फुरद वापरल्याने मंगलाच्या शोषणात सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

संज्ञांचा अर्थ  : (चित्रात पहा)

 • मिसळण्यास योग्य ( बरोबर खूण)      
 • मर्यादित मिसळ (चूक खूण आणि बरोबर खूण)  
 • मिसळणे अयोग्य (चूक खूण)
 • अ.ना.     अमोनियम नायट्रेट
 • अ.स.    अमोनियम सल्फेट
 • मो.अ.फॉ.    मोनो अमोनियम फॉस्फेट
 • कॅ.अ.ना.    कॅल्शिअम अमोनियम नायट्रेट
 • कॅ.ना.    कॅल्शियम नायट्रेट
 • मो.पो.फॉ.    मोनो पोटॅशियम फॉस्फेट
 • डा.अ.फॉ.    डाय अमोनियम फॉस्फेट
 • पो.स.    पोटॅशियम सल्फेट
 • फॉ.अॅ.    फॉस्फोरिक अॅसिड
 • पो.ना.    पोटॅशियम नायट्रेट
 • पो.ना.फॉ.    पोटॅशियम नायट्रेट फॉस्फेट

संपर्क : डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६
(मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...