उत्पादनवाढीसाठी जमिनीच्या प्रकारांची माहिती

जमिन सुधारणेसाठी हिरवळीच्या खतांचा वापर
जमिन सुधारणेसाठी हिरवळीच्या खतांचा वापर

पिकांच्या वाढीसाठी नैसर्गिक संरचना असलेली, उत्तम कर्ब असलेली, जल व वायुधारण क्षमता असलेली जमीन चांगली असते. कर्बाचे प्रमाण एकपेक्षा जास्त असेल, तर त्या जमिनी चांगल्या उत्पादनक्षम असतात. सर्व प्रकारच्या जमिनीच्या रचनेचा सार्वत्रिक अभ्यास केला असता असे दिसून येते, की रोपवाटिकेसाठी ग्रॅनुलर प्रकारची रचना उत्कृष्ट असते. आपल्या राज्यात जमिनीतील मातीच्या कणाच्या सहा प्रकारच्या रचना सापडतात.

  • आपल्याकडे सपाट काळ्या खोल जमिनीत सब अँगुलर, अँगुलर ब्लॉकी रचना जास्त प्रमाणात सापडतात. त्यानंतर कॉल्युमनार व प्रिझम प्रकारच्या रचना बेसाल्ट प्लेटच्या मूळ खडकापासून तयार झालेल्या जमिनीमध्ये सापडतात.
  • ज्या जमिनीमध्ये कर्बाचे प्रमाण जास्त असेल (साधारणतः ०.६ ते १.० पर्यंत) व रचना कॉल्यमुनार, प्रिझमसारखी असेल, तर अशा जमिनीत सछिद्रता जास्त प्रमाणात असते.
  • मातीच्या छिद्रात असंख्य उपयुक्त जीवाणू असतात. त्यांना पिकाच्या मुळांमध्ये प्रवेश करणे सोपे जाते. पाणी व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढल्यामुळे पाने जास्तीत जास्त प्रकाश संश्‍लेषण करतात, वाढ जोमाने होते. या विपरीत परिस्थिती असेल, तर वनस्पती संप्रेरकांद्वारे स्वतःची वाढ नियंत्रित करतात.  परिणामतः पिकाच्या उत्पादनात तफावत येते.
  • गेल्या काही वर्षांत जमिनीची सातत्याने मशागत केल्याने त्यांच्या मूळ नैसर्गिक रचना बदलल्या आहेत. त्यामुळे जमिनीच्या मूळ प्रकृतीचे नुकसान होत आहे; मात्र हे लक्षात घेऊन शून्य मशागत, किमान मशागतीसारखे जमिनीच्या मूळ रचनेला टिकवणारे तंत्रज्ञान रुजू लागले आहे. अमेरिकेत तीन दशकांत उठलेल्या धुळीच्या वादळामुळे शून्य मशागत पद्धती बंधनकारक करण्यात आली आहे.
  • जमीन वरून जरी चांगली दिसत असली तरी घनता व कर्बाची उपलब्धता ही जमिनीच्या आरोग्यावर दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरते. मातीची घनता १.१ ते १.३ mgm-३ ही अतिशय चांगली समजली जाते.
  • जमिनीतील कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जास्त उत्पादनक्षम पिकाच्या जातीमुळे जमिनीतून अन्नद्रव्यांचा उपसा वाढला आहे. त्या प्रमाणात जमिनीत पुन्हा विविध अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिसळली जात नाहीत. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहेत.
  • जमिनीतील कर्बाचे प्रमाण एकपेक्षा जास्त असेल, तर त्या जमिनी चांगल्या उत्पादनक्षम असतात. ०.५ ते ०.९ पर्यंत असेल, तर मध्यम ते चांगल्या आहेत. कर्बाचे प्रमाण ०.५ पेक्षा कमी होत असेल, तर जमिनीचे आरोग्य धोक्‍यात आहे, असे समजावे.
  • पिकांच्या वाढीसाठी नैसर्गिक संरचना असलेली, उत्तम कर्ब असलेली, जल व वायुधारण क्षमता असलेली जमीन चांगली असते.
  • जमिनीची रचना : मातीच्या कणांच्या रचनेनुसार जमिनीच्या आत आणि आपापसातील ढेकळात होणाऱ्या पाण्याच्या आंतरप्रवाहात आणि मुरण्यामध्ये बदल होत असतो.

  • ग्रॅनुलर (प्रत्येक छोटे छोटे ढेकूळ वेगळे असते.)
  • सब अँगुलर ब्लॉकी (ढेकूळ फोडले असता त्याला कडा दिसणे.)
  • कोरस अँगुलर ब्लॉकी (ढेकूळ फोडले असता त्याला मोठ्या कडा असतात).
  • प्रीझमॅटिक (प्रिझम सारख्या उभ्या बाजूने कडा असतात).
  • कॉल्युमनार (कॉलम प्रमाणे उभ्या मऊ कडा असतात).
  • प्लेटी (एकावर एक थर असतात)
  • संपर्क : डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४ (मृदशास्त्रज्ञ, पाअबंधारे विभाग परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com