agricultural news in marathi, management of grape orchard in low temprature , Agrowon, Maharashtra | Agrowon

कमी तापमानातील द्राक्षबागांचे नियोजन
डॉ. आर. जी. सोमकुंवर
बुधवार, 10 जानेवारी 2018

सध्या द्राक्षबागेत वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था दिसतात. लवकर फळछाटणी झाली असल्यास मण्यात पाणी उतरण्याची अवस्था दिसून येईल. उशिरा फळछाटणी झाली असलेल्या बागेत फक्त मण्याचा विकास होत आहे. सध्या कमी झालेल्या तापमानात बागेच्या व्यवस्थापनात बदल करावे लागणार आहेत.

मण्याची वाढ थांबणे :

सध्या द्राक्षबागेत वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था दिसतात. लवकर फळछाटणी झाली असल्यास मण्यात पाणी उतरण्याची अवस्था दिसून येईल. उशिरा फळछाटणी झाली असलेल्या बागेत फक्त मण्याचा विकास होत आहे. सध्या कमी झालेल्या तापमानात बागेच्या व्यवस्थापनात बदल करावे लागणार आहेत.

मण्याची वाढ थांबणे :

  • घडाचा विकास होण्याकरिता वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली पूर्ववत सुरू असणे गरजेचे असते. असे असल्यास जमिनीतून मुळाद्वारे उपलब्ध असलेले पाणी व अन्नद्रव्य उचलून वेलीस पोचवले जाते. ही परिस्थिती साधारणः किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतरच फायद्याची ठरते.
  • सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बऱ्याच भागांत तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. याचा वेलीच्या विविध हालचालींवर विपरीत परिणाम होताना दिसतो. या परिस्थितीमुळे मण्याचा विकास कमी होताना दिसतो.
  • या परिस्थितीवर मात करण्याकरिता बागायतदार संजीवकांची फवारणी करतात. ही फवारणी साधारणतः १२-१५ मिमी मण्याच्या आकारातील द्राक्षघडावर केली जाते. कारण उशिरा फळछाटणी झालेल्या बागेमध्ये अशा कमी तापमानात घडाचा विकास थांबतो. पुढे घडाची परिपक्वता होण्याकरिता वेळ कमी राहतो. या गोष्टींचा विचार करून बागायतदार नेहमीच्या शिफारशीपेक्षा पुन्हा एक किंवा दोन वेळा जीए व सीपीपीयूसारख्या संजीवकांची कमी प्रमाणात फवारणी करतात. त्याचा परिणाम मण्याची साल जाड होणे, मण्यात साखर कमी उतरण्यावर होतो. याच सोबत मण्याची परिपक्वतासुद्धा लांबणीवर जाते.
  • जर कमी तापमानात वेलीची शरीरशास्त्रीय हालचाली मंदावल्या असल्यास बाहेरून फवारलेल्या संजीवकांचा फारसा फायदा होत नाही.

उपाययोजना :

  • जीएची फवारणी करायची झाल्यास १२ मिमी आकाराच्या मण्याच्या अवस्थेपर्यंतच करावी.
  • किमान तापमान कमी झाल्यास मण्याची वाढ होण्याकरिता मुळी कार्यरत राहील, याची काळजी घ्यावी. याकरिता बोद मोकळे केल्यास त्यांचे चांगले परिणाम मिळतात. कारण या वेळी काळी पडत असलेली मुळी थोड्या फार प्रमाणात तुटेल किंवा उघडी पडेल. त्यानंतर आपण पाणी  देतो. त्याचा फायदा पुन्हा लवकर नवीन मुळी तयार होण्यास होतो.
  • बोदावर मल्चिंग आच्छादन केल्यास मुळीच्या भोवतालच्या तापमानात वाढ होते. त्याचाच परिणाम म्हणजे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग वाढण्यास मदत होईल. जमिनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य व पाणी वेलीवर वाढत असलेल्या घडापर्यंत पोचेल, त्यातून घडाचा विकास होईल.
  • बागेत पाणी जास्त उपलब्ध असल्यास मोकळे पाणी देता येईल. असे केल्याससुद्धा बागेतील तापमान वाढवण्यास मदत मिळेल.

संपर्क : ०२०- २६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,मांजरी, पुणे)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...