agricultural news in marathi, mango, cashew nut crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

आंबा, काजू पीक सल्ला
योगेश परुळेकर, डॉ. राजन खांडेकर
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

नोव्हेंबर महिन्यात पडलेली थंडी आंब्याला मोहोर आणण्यास पोषक होती. त्यामुळे ज्या बागांमध्ये पक्व पालवी आहे अशा बागांमध्ये मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. तसेच ज्या झाडांना पॅक्‍लोब्युट्रॉझॉल दिले आहे त्यांच्याही नवीन पालवीतून मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.
आंबा :

नोव्हेंबर महिन्यात पडलेली थंडी आंब्याला मोहोर आणण्यास पोषक होती. त्यामुळे ज्या बागांमध्ये पक्व पालवी आहे अशा बागांमध्ये मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. तसेच ज्या झाडांना पॅक्‍लोब्युट्रॉझॉल दिले आहे त्यांच्याही नवीन पालवीतून मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.
आंबा :

  • सतत बदलत असलेल्या वातावरणामध्ये  मोहोरावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
  • तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक (८० टक्के) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅंकोझेब (६३ टक्के) या संयुक्त बुरशीनाशकाची १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ३.३० नंतर करावी.
  • नोव्हेंबर महिन्यात आलेल्या मोहोरावर कणी (मोहरीच्या आकाराची फळे) दिसायला सुरवात होते. अशावेळी २० पीपीएम तीव्रतेची एन.ए.ए.ची (२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) फवारणी घ्यावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते.
  • फळवाढीच्या प्रक्रियेत फवारणीद्वारे खते दिल्यास फळाची वाढ चांगली होते. फळगळ रोखण्यासही या फवारणीची मदत मिळते. त्यामुळे फळे वाटाणा, गोटी व अंड्याची आकाराची असताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास याकाळात प्रतिझाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. तसेच बुंध्याजवळ गवताचे आच्छादन करावे. गरजेनुसार १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाण्याची दुसरी पाळी पुन्हा तशीच द्यावी.

काजू :

  • डिसेंबर महिन्यात काजूच्या कलमी झाडांना मोठ्या प्रमाणावर नवीन पालवी येऊ लागली आहे. नवीन पालवीमधून मोहोर येऊन फळधारणाही होत आहे.
  • अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ढेकण्या (टी मॉस्किटो) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढेकण्याच्या प्रादुर्भावामुळे नवीन येणारी पालवी, मोहोर तसेच फळे सुकून जातात.
  • ढेकण्याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त कोवळ्या फांद्या तसेच मोहोर कापून टाकाव्यात. ते सर्व बागेबाहेर नेऊन जाळून टाकावेत. बागेमध्ये लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

दालचिनी :

  • दालचिनी या मसाला पिकात पाने पोखरणाऱ्या अळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा डायमेथोएट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

काळीमिरी :

  • पोलुभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन १ मि.लि. किंवा डायमेथोएट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

संपर्क : योगेश परुळेकर, ८२७५४५४९७८
(कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...