बदलत्या तापमानात पिकांची काळजी महत्त्वाची

	 पिकांभोवती वारासंरक्षक कुंपण केल्याने तापमानातील फरकाचा ते सामना करु शकतात.
पिकांभोवती वारासंरक्षक कुंपण केल्याने तापमानातील फरकाचा ते सामना करु शकतात.

सद्यस्थितीत तापमानात दिवसा वाढ व रात्री घट असे वातावरण आहे. विविध पिकास ही परिस्थिती हानिकारक ठरते. त्याबाबत उपाययोजना करावी. केळी केळी पिकातील पाने थोडी करपतात. मुळांकडून अन्नद्रव्यांच्या शोषणावर विपरित परिणाम होतो. निसवणीच्या अवस्थेतील घड अडकतात तर निसवलेल्या घडातील केळींची वाढ मंदावते. उपाययोजना

  • बागेभोवती त्वरित शेडनेटचे कुंपण करावे. म्हणजे दिवसा उष्ण व रात्री थंड वारे यापासून संरक्षण होईल.
  • बागेत आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीचे तापमान कमी राहून मुळांची कार्यक्षमता पुर्ववत राहते.
  • पिकास प्रतिआठवडा प्रतिहजार झाडांसाठी युरिया ५.५ किलो, म्युरेट ऑफ पाेटॅश ७ किलो या प्रमाणात ठिबक संचातून सोडावे. निसवणीच्या व घडवाढीच्या अवस्थेतही अशीच खतमात्रा द्यावी. घडवाढीच्या अवस्थेत घडावर ०:५२:३४- ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • भाजीपाला दिवस व रात्रीच्या नेहमीच्या तापमानात १ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढ झाल्यास किडींची अंडी उबविण्यास अनुकूलता मिळते. परिणामी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. मातीच्या तापमानातील फरकामुळे मुळांची क्रिया मंदावते. उपाययोजना

  • भाजीपाला पिकात खुरपणीची एक पाळी द्यावी. माती हलल्याने मुळांना थंड हवा मिळते व त्यांच्याकडून अन्नद्रव्यांचे पूर्ववत शोषण होते.
  • पिकांच्या पेशी फुगीर नसल्यास (टर्जिड) त्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थित शोषण करू शकत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत पिकांना कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कीड संरक्षण :

  • कोबीवर्गीय पिकांवरील फुलकिडे : फवारणी प्रतिलिटर पाणी अॅझाडिरॅक्टीन ३,००० पीपीएम - ५ मि.लि.
  • फळवर्गीय व वेलवर्गीय भाजीपाला पांढरी माशी : फवारणी प्रतिलिटर डायमिथोएट - २ मि.लि. कोळी : फवारणी प्रतिलिटर : प्रॉपरगाईट - १ मि.लि. किंवा इथिऑन - १ मि.लि. शेंडा तसेच फळे पोखरणारी अळी : फवारणी प्रतिलिटर डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के) - १ मि.लि.
  • भेंडीवरील पांढरी माशी : फवारणी प्रतिलिटर इमिडाक्लोप्रिड ०.२ मि.लि.
  • टीप : तज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. आंबा

  • फळगळीची शक्यता वाढते. यासाठी सकाळी किंवा सायंकाळी झाडांना पाणी द्यावे, आच्छादन करावे.
  • भुरी,करपा या रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. भुरी रोग नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ ग्रॅम करपा रोग नियंत्रण : प्रतिलिटर पाणी कॅप्टन २ ग्रॅम किंवा कॉपरऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम.
  • संपर्क : डॉ. नाझिमोद्दिन शेख, ७५८८०५२७९२ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    संपर्क : डाॅ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.)

    संपर्क : डॉ. संजय पाटील , ९८२२०७१८५४ (फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com