मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर
फळबाग
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये संत्रा आणि मोसंबीच्या बागेमध्ये फळगळचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. ही स्थिती सध्याच्या वाढलेल्या तापमानामुळे आहे. सध्या काही ठिकाणी तापमान ४२-४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याचे दिसून येत आहे. सरासरीपेक्षा ३-४ अंशाने अधिक तापमान असल्याने अंबिया बहाराच्या (वसंत ऋतुबहर) फळांची गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुख्यतः उशिरा येणाऱ्या फुलोऱ्याच्या बागेत आणि त्यातही पारंपरिक पद्धतीने सिंचन केल्या जाणाऱ्या बागेमध्ये पाने व फळांची गळ अधिक होताना दिसते.
उपाययोजना :

- नियमित ठिबक सिंचन वेळापत्रकाप्रमाणे सध्या एप्रिल महिन्यात १०० ते १२० लिटर पाणी/दिवस/ झाड पाणी द्यावे. पुढे मे महिन्यात १६० ते १८० लिटर पाणी/दिवस/झाड ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
- आळे पद्धतीने पाणी देत असल्यास ३ ते ४ दिवसांच्या अंतराने डबल रिंग पद्धतीने मातीच्या मगदुराप्रमाणे पाणी (कमी प्रमाणात पण जास्त वेळा विभागून) द्यावे.
- प्लॅस्टिक किंवा गवताने आळ्यामध्ये आच्छादन करावे.
- फवारणी : २,४-डी (१५ पी.पी.एम) १.५ ग्रॅम अधिक युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा पुढे १५ दिवसाच्या अंतराने जीए-३, (१५ पी.पी.एम) १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १२० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
संपर्क : डॉ. एम.एस. लदानिया, ०७१२-२५००५७२
(संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)
- 1 of 6
- ››