मातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय आवश्‍यक

दगडी बांध
दगडी बांध

जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची तीव्रता खूप जास्त असते. त्यामुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी मातीचा सुपीक थर नष्ट होतो. तसेच बेसुमार भूजल उपशामुळे पाण्याची पातळी कमी होऊन अवर्षणाची तीव्रता वाढली आहे.त्यामुळे सद्यस्थितीत जलसंधारणाच्या उपाययोजना करणे ही अत्यंत आवश्‍यक ‍बाब ठरली आहे. जलसंधारणाच्या विविध पद्धतींवरून जलसंधारणाचे विविध उपचार आहेत. त्यामध्ये ओघळीवरील उपचार व क्षेत्रावरील उपचार या दोन उपचारांचा समावेश होतो.

पाणलोटातील जलसंधारणाचे उपचार ओघळ/ नाल्यावरील उपचार : याच्यामध्ये जैविक बांध, फांदी बांध, लहान माती बांध, अनघड दगडाचे बांध, गॅबियन बंधारा, भूमिगत बंधारा, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, शेततळे, पुनर्भरण चर, वळण बंधारा यांचा समावेश होतो. क्षेत्रावरील उपचार : याच्यामध्ये सलग समपातळी चर, डोंगर उतारावर समपातळी बांध घालणे, कंपार्टमेंट बंडिंग, ढाळीचे बांध यांचा समावेश होतो.

ओघळीवरील उपचार जैविक बांध पाणलोटाच्या वरील भागात ज्या ठिकाणी ओघळ तयार होते, असा ठिकाणी गवताच्या १ किंवा २ ओळी लावून जो बांध केला जातो, त्यास जैविक बांध म्हणतात. जागेची निवड : पाणलोटातील वरील भागात पाण्याच्या प्रवाहाने लहान लहान ओघळी बनतात. अशा सर्वसाधारण ३० सें.मी.पर्यंत खोलीच्या ओघळीवर जैविक बांध घालण्यात यावे.

मातीचे लहान बांध : ओघळीच्या रुंदीएवढ्या लांबीच्या ओघळीमध्ये मातीचा बांध घातला जातो त्यास अर्दन स्ट्रक्‍चर किंवा मातीचे लहान बांध असे म्हणतात.

जागेची निवड

  • बांधावरील पाणलोट क्षेत्र १० हेक्‍टरपेक्षा कमी असावे.
  • ओघळीच्या लंब छेदाच्या आधारे जागा निश्‍चित करावी.
  • सांडव्यासाठी कठीण मुरूम लागेल अशी जागा असावी.
  • नालाच्या तळात उघड्या खडकावर बांधाची जागा निश्‍चित करू नये.
  • अनघड दगडी बांध   पाणलोटाच्या वरील व मधील भागातील ओघळीवर त्या क्षेत्रात जे दगड उपलब्ध आहेत, ते वापरून तयार केलेल्या बांधास अनघड दगडी बांध असे म्हणतात. जागेची निवड

  • लहान बांधासाठी पाणलोट क्षेत्राचा वरचा भाग व मोठ्या बांधासाठी पाणलोट क्षेत्राचा मधला भाग निवडावा.
  • एल सेक्‍शनवरून बांधाची जागा निश्‍चित करावी. दोन बांधामध्ये उभे अंतर १ मीटरपेक्षा जास्त असावे.
  • नाल्यात ज्या ठिकाणी उघडा खडक खडक आहे, अशा ठिकाणी बांधाची जागा निश्‍चित करू नये.
  • बांध प्रवाहाशी काटकोनात येईल असी जागा असावी.
  • गॅबियन (जाळी) बंधारा नाल्यामध्ये जाळीच्या वेष्टनात जो बांध घातला जातो, त्यास गॅबियन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी नाल्याचा उतार ३ पेक्षा जास्त आहे, तसेच पर्जन्यमान जास्त असल्यामुळे लूज बोल्डर स्ट्रक्‍चर टिकू शकत नाही. अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधतात. जागेची निवड

  • नाल्याची रुंदी १० मी.पेक्षा जास्त नसावी.
  • बांधाची जागा नाल्याच्या वळणावर नसावी.
  • जागा ज्या ठिकाणी खडक व मुरूम आहे अशा ठिकाणी नसावी.
  • मातीनाला बांध नाला पात्रामध्ये मातीचा बांध घालून पाणीसाठा करणे, पाणी अडविणे, पाणी जिरविणे व जास्त झालेले पाणी चारीद्वारे सुरक्षित काढून देणे, अशा प्रकारच्या बांधास मातीनाला बांध म्हणतात. जागेची निवड

  • बांध घालावयाच्या ठिकाणचे पाणलोट क्षेत्र ४० ते ५०० हेक्‍टरच्या दरम्यान असावे.
  • नाला तळाचा उतार ३ टक्क्यांपेक्षा कमी असावा.
  • नाला तळरुंदी ५ ते १३ मीटरच्या दरम्यान असावी.
  • नालापात्राची खोली १ मीटरपेक्षा कमी असू नये.
  • नालाबांध प्रवाहास काटकोनात येईल अशी जागा असावी.
  • जलसंधारणाच्या उपचार पद्धतींची प्रमुख उद्दिष्टे   

  • जमिनीची धूप कशी कमी करता येईल?
  • पडणारा पाऊस जास्तीत जास्त कसा मुरविता येईल?
  • जास्त झालेले पावसाचे पाणी शेताबाहेर सुरक्षितरीत्या
  • कसे काढता येईल.
  • अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी काय व्यवस्था करता येईल?
  • जलसंधारणाच्या पद्धती ठरविताना महत्त्वाच्या बाबी

  • पाऊसमान जमिनीचा प्रकार
  • जमिनीचा उतार जमिनीची खोली
  • जमिनीवरील आच्छादन
  • ज्या ठिकाणी कमी पाऊस, कमी उतार व कमी खोलीच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी जागच्या जागी पाणी मुरविण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस व जास्त उताराच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी अभियांत्रिकी कामे करून जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • जलसंधारण उपचारांचे फायदे

  • जमिनीची धूप होऊन तिचे नुकसान होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच बेसुमार भूजल उपशामुळे पाण्याची पातळी कमी होऊन अवर्षणाची तीव्रता वाढली आहे. जलसंधारणाच्या उपचारांमुळे या समस्यांवर उपाय मिळविता येतो.
  • मातीचा सुपीक थर ज्याची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. जो थर वाहून जात आहे व जमिनी निकृष्ट बनत आहेत. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी जमिनीची धूप कमी होते.
  • जलसंधारणामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याला अटकाव
  • बसल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये जमिनीतच साठवून ठेवली जातात. जमिनीतील ओलावा वाढून उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते.
  • संपर्क : अतुल अत्रे, ९८६०५९३८३६, (डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com