agricultural news in marathi, need of proper temprature for groundnut sowing , Agrowon, Maharashtra | Agrowon

भुईमूग लागवडीवेळी तापमान लक्षात घ्या
डी. एम. काळे
बुधवार, 3 जानेवारी 2018

भुईमूग पिकाचे स्पॅनिश आणि व्हर्जिनिया असे प्रमुख प्रकार आहेत. स्पॅनिश प्रकारच्या जातीचा पक्व काळ लवकर आणि व्हर्जिनिया प्रकारच्या जातीचा पक्व काळ उशिरा असतो. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर लागवडीस सुरवात करावी.

भुईमूग पिकाचे स्पॅनिश आणि व्हर्जिनिया असे प्रमुख प्रकार आहेत. स्पॅनिश प्रकारच्या जातीचा पक्व काळ लवकर आणि व्हर्जिनिया प्रकारच्या जातीचा पक्व काळ उशिरा असतो. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर लागवडीस सुरवात करावी.

 • उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीस जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर सुरवात करावी. गेल्या हंगामात भुईमुगाची लागवड झाल्यानंतर तापमानात अचानक वाढ झाली. याचा पुढे पीक वाढ, उत्पादन आणि दर्जावर परिणाम झाला. विशेषतः मशागतीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये परिणाम अधिक प्रमाणात दिसून आला. हे लक्षात घेऊन योग्य तापमान होताच लागवडीचे नियोजन करावे.
 • भुईमूग उत्पादनासाठी जमीन, पाणी आणि हवामान हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रामुख्याने तापमान, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश यांचा पीक वाढ व उत्पादनावर प्रत्यक्ष परिणाम होतो. भुईमूग पिकाचे स्पॅनिश (फांद्यांची संख्या मध्यम) आणि व्हर्जिनिया (फांद्यांची संख्या अधिक) प्रमुख प्रकार आहेत.

पीक वाढीच्या अवस्था

 • उगवण ः  ८ ते १० दिवसांनी होते.
 • फूलधारणा ः २५ ते ३५ दिवसांनी होते.
 • आरी सुटणे ः ३० ते ४० दिवसांनी होते.
 • शेंग धारणा ः ४५ ते ५५ दिवसांनी होते.
 • शेंग पोषण ः ६० ते ७५ दिवसांनी होते.
 • शेंग पक्वता ः ११५ ते १३५ दिवसांनी होते.

पीक वाढीच्या अवस्थेत तापमानाचा परिणाम
बियाणे उगवण
जमिनीतील तापमानाचा परिणाम बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीवर होतो. जमिनीतील तापमान १५ अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. यापेक्षा तापमान कमी असल्यास उगवण उशिरा व कमी होते. वातावरणातील तापमान ५४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास बियाणातील भ्रूण मरतो. उगवण होत नाही.

रोप वाढ
वातावरणातील २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानामध्ये रोपाची वाढ जलद गतीने होते.

फूलधारणा
वातावरणातील तापमान २४  ते २७ अंश सेल्सिअसमध्ये असल्यास फूलधारणा अधिक प्रमाणात होते. वातावरणातील तापमान सतत ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास फुलातील पराग कणांच्या सजीव क्षमतेवर परिणाम होतो. फुलामध्ये वंध्यत्व (वांझपणा) येते. त्यामुळे शेंगधारणा होत नाही.

शेंगधारणा
जमिनीतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसमध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फूलधारणा ते पक्वता या कालावधीत जमीन व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्या संख्येत घट होते.

सूर्यप्रकाशाचे महत्त्व
भुईमूग पिकास भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. सूर्यप्रकाशाचा पानांचे प्रकाश संश्लेषण आणि श्वासोच्छवासावर परिणाम होतो. दिवसा सूर्यप्रकाश कालावधी दहा तास असल्यास झाडाची वाढ जोमदार होते. अधिक तासाच्या दिवसामध्ये झाडांना फूलधारणा कमी होते. स्वच्छ व निरभ्र सूर्यप्रकाश असल्यास फूल व आऱ्यांच्या संख्येत वाढ होते. शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, दाणे आकर्षक होतात. उत्पादनात वाढ होते.

गेल्या वर्षीतील तापमानाचा परिणाम

 • गेल्या हंगामात भुईमूग लागवड झाल्यानंतर मार्च महिन्याच्या आरंभापासून वातावरणातील तापमानात अचानक वाढ झाली. पुढे तापमान वाढत गेले. याचा पीक वाढीवर परिणाम झाला. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली.
 • विदर्भ, मराठवाडा विभागात काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भुईमूग झाडाची वाढ भरपूर झाली. परंतु शेंगा लागल्या नाहीत.
 • काही विभागामध्ये शेंगा थोड्या प्रमाणात लागल्या, परंतु शेंगांचे पोषण बरोबर झाले नाही. दाण्याचा दर्जा कमी झाला. उत्पादनात घट झाली.

संपर्क : डी. एम. काळे, ९९३०७५७२२५
(लेखक भुईमूग शास्त्रज्ञ आहेत.)

इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
लागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
लागवड उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
मोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...
तंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...
आरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...
सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापनएकात्मिक कीड व्यवस्थापन पिकाच्या...
सोयाबीनवर दिसतोय खोडमाशीचा प्रादुर्भावराज्यामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत...
रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणीसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही...
सोयाबीन उत्पादनवाढीची सप्तसूत्रेसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची...
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
करडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसितभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच...
कृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...
कृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
नारळ बागेत ठेवा स्वच्छतापहिली दोन वर्षे नारळ रोपांना विणलेले झाप, झावळ्या...
मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे...अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील...
उन्हाळी तीळ लागवडीमुळे योग्य पीक...उन्हाळी तीळ लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करून घ्यावी...