| Agrowon

अंटार्क्टिकावर भाजी पिकविण्यात यश
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

पृथ्वीच्या एका टोकाला असलेल्या अंटार्क्टिकावर
अतिथंड हवामान, बर्फाळ प्रदेश आदी प्रतिकूलतेमुळे कुठलीही वनस्पती उगवू शकत नाही. मात्र, येथील प्रयोगशाळेत लेट्यूस या भाजीसह काकडी, मुळा पिकविण्यात जर्मन संशोधकांना यश आले आहे.

पृथ्वीच्या एका टोकाला असलेल्या अंटार्क्टिकावर
अतिथंड हवामान, बर्फाळ प्रदेश आदी प्रतिकूलतेमुळे कुठलीही वनस्पती उगवू शकत नाही. मात्र, येथील प्रयोगशाळेत लेट्यूस या भाजीसह काकडी, मुळा पिकविण्यात जर्मन संशोधकांना यश आले आहे.

यशस्वी प्रयोगामुळे अंतराळात भाजीपाला पिकविण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. जर्मनीचे अंटार्क्टिकावर ‘नेऊमायेर स्टेशन ३’ नावाचे संशोधन केंद्र असून, या केंद्रावर कंटेनरच्या आकाराची हरितगृह प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमध्ये संशोधकांनी ताज्या भाज्या पिकविल्या. अंतराळात भाज्या पिकविण्याच्या उद्देशाने ‘इडेन आयएसएस’ या प्रयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या प्रयोगशाळेत भाज्या पिकविण्यात आल्या. या प्रयोगाला मोठे यश मिळाले असून, संशोधकांनी पहिल्या हंगामातच साडेतीन किलो लेटयूस, ७० मुळे आणि १८ काकड्यांचे उत्पादन घेतले. संशोधकांकडून टोमॅटोसह इतर भाज्याही वाढविल्या जात आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन आठवड्याला पाच किलो भाज्या पिकविल्या जाण्याची शक्‍यता आहे. संशोधक बर्नहार्ड ग्रॉप म्हणाले, ‘‘आपल्या घरासमोरच्या बागेतील भाज्यांप्रमाणेच आम्ही अंटार्क्टिकावरील प्रयोगशाळेत पिकविलेल्या भाज्या ताज्या आहेत. त्यासाठी, अंटार्क्टिकावर अंतराळयानासारखेच वातावरण तयार करण्यात आले होते. थोडक्‍यात, कुठलीही जमीन किंवा सूर्यप्रकाश नसलेल्या बंदिस्त वातावरणात या भाज्यांची निर्मिती झाली. आम्ही पाण्यासह प्रकाश आणि कार्बन डायऑक्‍साईडचेही अगदी सूक्ष्म नियोजन केले होते.’’

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...