मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे करण्यात यश

मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे करण्यात यश
मोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे करण्यात यश

अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील संशोधकांनी मोहरीवर्गीय पिकातील कॅमेलिना आणि कॅरेनाटा बियांपासून ग्लुकोसिनोलेट हा घटक वेगळा करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे मोहरी वर्गातील पिकातील विषारी असलेला घटक वेगळा करून पशुखाद्यामध्ये पेंडींचा वापर वाढविणे शक्य होणार अाहे. तसेच बुरशी, तणे किंवा कर्करोग पेशींना नष्ट करण्यामध्ये हा घटक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या पिकांतून चांगला फायदा मिळू शकतो.

कॅमेलिना आणि कॅरेनाटा या अखाद्य तेलबियांपासून मिळविलेल्या तेलाचा वापर जेट इंधन म्हणून केला जातो. या जैव इंधनाचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरत नाही. बियातून तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पेंडीमधून ग्लुकोसिनोलेट हा घटक वेगळा करण्याचे तंत्र विकसित करण्यात अाले अाहे. त्याविषयी माहिती देताना दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील जैवप्रक्रिया अभियंते व सहयोगी प्रा. झेंग्रॉंग जिम्मी गू यांनी सांगितले, की ग्लुकोसिनोलेट हा घटक तेल काढल्यानंतरही शिल्लक राहतो. या पेंडीमधून हा घटक वेगळा करण्याचे तंत्र विकसित केल्यामुळे कोणत्याही अनुदानाशिवाय जैवइंधन फायद्याचे ठरू शकते. असा होईल फायदा

  • कॅमेलिना आणि कॅरेनाटा यांच्या पेंडीमध्ये असलेल्या ग्लुकोसिनोलेट हा घटक विषारी आहे. त्यामुळे पशुखाद्यामध्ये या दोन्ही बियांच्या पेंडींचे प्रमाण फक्त १० टक्क्यांपर्यंतच ठेवता येते. हा विषारी घटक वेगळा केल्याने पशुखाद्यामध्ये पेंडीचे प्रमाण वाढविणे शक्य होईल.
  • ग्लुकोसिनोलेट हा बुरशी आणि तणांच्या नियंत्रणासाठी किंवा कर्करोगांच्या पेशी नष्ट करण्यासाठी वापरणे शक्य असल्यामुळे भविष्यात या उत्पादनाला चांगली किंमत मिळू शकते.
  • तेलबियातील सर्व घटकांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास जैवइंधनाचा पर्याय आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com