खास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे !

साच्याचा वापर करुन भोपळा व कलिंगड यांना दिलेला आकार
साच्याचा वापर करुन भोपळा व कलिंगड यांना दिलेला आकार

अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले महत्त्व लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी अमेरिकेतील शेतकऱ्यांनी भोपळ्याच्या फळाला मानवी चेहऱ्याच्या साच्यामध्ये बसविण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

जपानमधील काही कंपन्यांनी खास प्रकारच्या साच्याचा वापर करून काही वर्षांपूर्वी चौकोनी आकाराचे कलिंगड बाजारपेठेत आणले. त्याला ग्राहकांच्याकडून चांगली मागणीदेखील मिळाली. त्यामुळे अमेरिकेतील काही फळ उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांनी भोपळ्याला साच्याच्या माध्यमातून आकार देता येईल का, याचे प्रयोग सुरू केले. त्यात त्यांना यश मिळाले आहे. हॅलोवीन सणामध्ये अशा प्रकारच्या भोपळ्याला ग्राहकांची संभाव्य मागणी लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला. अमेरिकेतील कंपन्यांनी भोपळ्यांना मानवी चेहऱ्याचा आकार देण्यासाठी विशिष्टप्रकारचे साचे तयार करून दिले. यंदाच्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांनी साच्‍याचा वापर करून भोपळ्याचे उत्पादनदेखील घेतले. फळाला आकार देण्यासाठी वाढीच्या विशिष्ट टप्प्यामध्ये साचा फळावर बसवावा लागतो. कारण या टप्प्यात फळ आणि वेल दोन्हीही नाजूक असते. भोपळा फळावर साचा बसविण्यासाठी कुशल मजुराची आवश्यकता असते. फळाच्या विशिष्ट वाढीच्या टप्प्यानंतर हे साचे परत काढावे लागतात. त्यामुळे पुढे फळवाढीवर परिणाम होत नाही. यंदाच्यावर्षी काही शेतकऱ्यांना फळांना आकार देण्यामध्ये चांगले यश मिळाले. पहिल्यावर्षीच्या अनुभवातून पुढील वर्षातील हंगामासाठी शेतकरी या प्रयोगामध्ये सुधारणा करणार आहेत. काही मोठ्या दुकानदारांच्याकडूनही अशा प्रकारच्या भोपळ्यांना मागणी आली असल्याने पुढील वर्षीदेखील काही भोपळा उत्पादक साच्याचा वापर करून वैशिष्ट्यपूर्ण भोपळ्यांचे  उत्पादन घेणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com