agricultural news in marathi, news regarding need of soya products and cabbage after cure of cancer, Agrowon, Maharashtra | Agrowon

कर्करोगोत्तर आहारात हवे सोया पदार्थ, कोबीवर्गीय भाज्या
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

स्तनाच्या कर्करोगासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारादरम्यानचे दुष्परिणाम (साईड इफेक्टस) कमी करण्यासाठी सोया दूध, टोफू यांसारखी सोया उत्पादने आणि कोबीवर्गीय भाज्या उपयुक्त ठरू शकत असल्याचे जॉर्जटाऊन विद्यापीठातील वैद्यकीय विभागात झालेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन ‘ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अॅण्ड ट्रिटमेंट’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

स्तनाच्या कर्करोगासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारादरम्यानचे दुष्परिणाम (साईड इफेक्टस) कमी करण्यासाठी सोया दूध, टोफू यांसारखी सोया उत्पादने आणि कोबीवर्गीय भाज्या उपयुक्त ठरू शकत असल्याचे जॉर्जटाऊन विद्यापीठातील वैद्यकीय विभागात झालेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन ‘ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अॅण्ड ट्रिटमेंट’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

स्तनाच्या कर्करोगासाठी उपचार पूर्ण झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षानंतर उपचाराचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. प्रामुख्याने इस्ट्रोजन  संप्रेरकाची निर्मिती आणि वापरावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे शरीरातून उष्णता बाहेर पडणे किंवा रात्रीच्या वेळी अधिक घाम येण्यासारखे अनुभव रुग्णांना येतात. कर्करोगानंतरच्या आयुष्यामध्ये झालेले बदल मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत असतात. अशा दुष्परिणामावर आहारातील घटकांमुळे होणारे बदल तपासण्यात आले. त्यासाठी अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठामध्ये कार्यरत संशोधकांनी अमेरिकेतील १७३ स्पॅनिश व्यतिरिक्त श्वेतवर्णीय आणि १९२ चीनवंशीय महिलांतील स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेतलेल्या रुग्णांचा अभ्यास केला.

  • सामान्यतः चिनी महिलांमध्ये हे कर्करोगोत्तर त्रासदायक बदल कमी असल्याचे जाणवत होते. मात्र, त्यासाठी कोणतीही संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध नव्हती. चिनी आहारामध्ये सोया आहार आणि कोबीवर्गीय भाजीपाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे अभ्यासामध्ये चिनी महिलांचा प्रामुख्याने समावेश केला असल्याचे वरिष्ठ संशोधक ज्युडी हुयेई-यू वांग यांनी सांगितले.  
  • पूर्ववैद्यकीय अभ्यासामध्ये सोया आणि कोबीवर्गीय भाज्यांमध्ये असलेले जैविक संयुगे ही स्तनाच्या कर्करोगांच्या पेशींच्या वाढीला कारणीभूत होत असल्याचे मानले जाते. मात्र, कर्करोगाचे निदान झाल्यानंतर या घटकांचा वापर केल्यास नेमका चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले. अर्थात अधिक अभ्यास होण्याची आवश्‍यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात निष्कर्ष :

  • कोबीवर्गीय भाज्या आणि सोयाबीन आधारीत विविध उत्पादनांचा अधिक वापर केल्यास रजोनिवृत्ती काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे प्रमाणही कमी होते.
  • कर्करोगावरील उपचारामध्ये इस्ट्रोजेन घटकांचे प्रमाण कमी झाल्याने अनेक समस्या उद्‌भवतात. त्यावरही या घटकांचा फायदा होऊ शकतो.
  • अधिक सोयाबीन आहारात असल्यास ताणांचे प्रमाण कमी होते.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...