agricultural news in marathi, news regarding yogurt , Agrowon, Maharashtra | Agrowon

गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची निर्मिती शक्य
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड दह्यापासून तयार होणारी निवळी (व्हे) ही टाकाऊ घटक असली तरी त्याचे मूल्य प्रचंड मोठे आहे. जर्मनी येथील ट्युबुंगेन विद्यापीठातील प्रा. लार्स अॅन्गेनेंट यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने या निवळीपासून सूक्ष्मजीवांच्या साह्याने मध्यम साखळीचे कार्बोक्झॅलिक अॅसिड (एमसीसीए) निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या आम्लयुक्त तेलाचा वापर पशुखाद्यामध्ये किंवा इंधन म्हणून करणे शक्य आहे. हे संशोधन ‘जर्नल ज्यूल’मध्ये प्रकाशित केले आहे.

योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड दह्यापासून तयार होणारी निवळी (व्हे) ही टाकाऊ घटक असली तरी त्याचे मूल्य प्रचंड मोठे आहे. जर्मनी येथील ट्युबुंगेन विद्यापीठातील प्रा. लार्स अॅन्गेनेंट यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने या निवळीपासून सूक्ष्मजीवांच्या साह्याने मध्यम साखळीचे कार्बोक्झॅलिक अॅसिड (एमसीसीए) निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या आम्लयुक्त तेलाचा वापर पशुखाद्यामध्ये किंवा इंधन म्हणून करणे शक्य आहे. हे संशोधन ‘जर्नल ज्यूल’मध्ये प्रकाशित केले आहे.

दूग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये चीज किंवा योगर्ट निर्मितीमध्ये आम्लयुक्त निवळी (व्हे) हे उपउत्पादन मिळते. त्यामध्ये गोड निवळीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी प्रथिने असतात. त्यामुळे खाद्य उद्योगासाठी उपयुक्त घटक फारसे मिळत नाहीत. २०१५ मध्ये प्रकाशित केलेल्या अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार, दर वर्षी ७७१ हजार मे. टन ग्रीक योगर्ट तयार होते. हे अमेरिकच्या एकूण योगर्ट बाजारपेठेच्या ४० टक्के भरते. ही बाजारपेठ २००४ पासून सातत्याने वाढत आहे.  

एक लिटर दुधाचे रूपांतर ग्रीक योगर्टमध्ये होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन लिटर आम्लयुक्त निवळी तयार होते. त्याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या उद्योगासमोर आहे. काही कंपन्यांनी हवारहित डायजेस्टरद्वारे मिथेन निर्मितीचा पर्याय निवडला असून, त्याद्वारे वीज तयार केली जाते. काही कंपन्या त्यातील लॅक्टोज मिळवण्याचा प्रयत्न करतात.
निवळीमधील सेंद्रिय घटकांच्या उपलब्धतेमुळे शेतीमध्ये खत म्हणूनही वापर केला जातो. अर्थात, त्याच्या आम्लतेमुळे शेतकऱ्यांना अधिक प्रमाणामध्ये ती वापरता येत नाही. त्याच प्रमाणे जनावरांच्या खाद्यामध्येही निवळीचा अधिक वापर करणे शक्य नसते. यामुळे कंपन्यांसाठी निवळीची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्याच ठरते.

असे आहे संशोधन
संशोधकांनी योगर्ट व्हेपासून उपयुक्त तेलांच्या निर्मितीसाठी कार्बोक्झिलेट तंत्रप्रणालीची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी हवारहित स्थितीमध्ये कार्य करणाऱ्या सूक्ष्मजिवांचा वापर केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ५० अंश सेल्सिअस तापमानामध्ये कार्य करणाऱ्या सूक्ष्मजिवांचा गट सर्व प्रकारच्या शर्करेपासून मध्यम प्रतिचे आम्ल बनवतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये किंचित कमी तापमान (३० अंशामध्ये) कार्यरत सूक्ष्मजिवांचा वेगळा गट कार्बनच्या सहा ते नऊ अणू एका ओळीमध्ये त्याचे रूपांतर करतो. सी ६ ते सी ९ ही संरचना तेलाप्रमाणे असते. शुद्धीकरणानंतर त्याचा वापर जैवइंधन म्हणून करता येतो.

कोणत्याही बाह्य इलेक्ट्रॉन शोषणाऱ्या घटकांचा वापर न करता आंबट निवळीपासून अत्यंत मौल्यवान ठरणारे कार्बोक्झॅलिक आम्ल (एमसीसीए) - कॅप्रोईक अॅसिड (एन - हेक्सानोईक आम्ल) आणि एन- कॅप्रिलीक अॅसिड ( एन- ऑक्टोनोईक आम्ल) मिळवता येऊ शकते. या रसायनांचा वापर जैवइंधन म्हणून किंवा पशुखाद्यामध्ये करता येतो. ही प्रक्रिया अत्यंत कमी ऊर्जेवर कार्य करते.
- प्रा. लार्स अॅन्गेनेंट, ट्युबुंगेन विद्यापीठ, जर्मनी

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...