शेंगवर्गीय भाजीपाला लागवड

चवळी व श्रावण घेवडा
चवळी व श्रावण घेवडा

शेंगवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये गवार, श्रावण घेवडा, चवळी, वाल आदी भाजीपाला पिकांचा समावेश होतो. उन्हाळी हंगामात त्यांच्या लागवडीसाठी पोषक हवामान असते. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या भाजीपाला पिकांची लागवड पूर्ण करून घ्यावी.

शेंगवर्गीय भाजीपाला पिकांच्या कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी वापर होतो. वाळलेल्या बियांचा उसळ किंवा डाळीसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.  

सुधारित जाती :

  • श्रावण घेवडा : कंटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, कोकण भूषण.
  • गवार : पुसा सदाबहार, पुसा नवबहार, मोसमी.
  • चवळी :  पुसा फाल्गूनी, पुसा बरसाती, अर्का गदिमा, पुसा दोफसली.
  • वाल : अर्का जय, अर्का विजय, वाल कोकण १.
  • लागवड तंत्रज्ञान : शेंगवर्गीय भाजीपिकांची लागवड प्रामुख्याने बियांची पेरणी करून किंवा टोकण पद्धतीने केली जाते.  

                                         लागवड अंतर व बियाणे प्रमाण

    शेंगवर्गीय भाजीपिके     लागवडीचे अंतर (सेंटीमीटर)    प्रति हेक्टरी बियाणे (किलो)

    श्रावण घेवडा झुडूपी जाती वेली जाती    

    ३०x१५ ६०x३०  

    ४०-५० २५-३०
    गवार     ४५x१५     १५-२०
    चवळी     ४५x३०     १५-२०
    वाल    ९०x९०     २०-३०

    गवार :

  • लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मात्र पोयट्याची, उत्तम निचऱ्याची आणि सामू ७ ते ७.५ असलेल्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते.
  • उन्हाळी हंगामात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत पेरणी करावी.
  • गवारीच्या कोवळ्या शेंगा जातीनुसार साधारणपणे ६ ते ८ आठवड्यांत तोडणीला येतात. शेंगाची ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित तोडणी करावी. शेंगा जाड होण्यापूर्वीच तोडाव्यात.
  • प्रतिहेक्‍टरी साधारणपणे ४ ते ७ टन उत्पादन मिळते.
  • श्रावण घेवडा :

  • लागवडीसाठी हलकी ते मध्यम पोयट्याची जमीन निवडावी.  
  • पूर्वमशागत केल्यानंतर प्रतिहेक्‍टरी २५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.
  • उन्हाळी लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.
  • कोवळ्या शेंगाची तोडणी करावी. अर्का कोमल जातीच्या शेंगाची पहिली तोडणी पेरणीपासून ४५ दिवसांनी सुरू होते.
  • प्रतिहेक्‍टरी साधारणपणे ३ ते ४ टन इतके उत्पादन मिळते.
  • वाल :

  • लागवडीसाठी हलकी ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.  
  • उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पुर्ण करावी.
  • भाजीसाठी कोवळ्या शेंगा काढाव्यात. शेंगा वाळलेल्या असल्यास त्यांच्यातील दाणे काढून ते भाजीसाठी वापरतात.
  • बुटक्‍या जातीच्या शेंगांचे प्रतिहेक्‍टरी ५ ते ७ टन उत्पादन मिळते; तर उंच वेतीसारख्या जातींमध्ये शेंगाचे प्रतिहेक्‍टरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते.
  • चवळी :

  • चवळीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी.  
  • पूर्वमशागत करून प्रतिहेक्‍टरी २५ टन शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
  • उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी; तसेच लागवडीसाठी सरी वरंब्यांचा वापर करावा.
  • चवळीचे प्रतिहेक्‍टरी ५ ते ८ टन हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते.
  • पीकसंरक्षण : श्रावण घेवडा : कीड : मावा, शेंगा पोखरणारी अळी, कोळी आणि खोडमाशी नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी डायमेथोएट ः २ मि.लि. किंवा सूचना : कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर किमान सात दिवस शेंगा तोडू नयेत. रोग : तांबेरा नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर कार्बेन्डाझिम ०.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम   गवार : कीड : हिरव्या किंवा काळा मावा नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर डायमेथोएट : १.५ मि.लि. सुत्रकृमी : नियंत्रण : पेरणीपूर्वी जमिनीत प्रतिहेक्‍टरी २०० किलो निंबोळी पेंड मिसळावी. रोग : अँथ्रॅक्‍नोज नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर मॅन्कोझेब : २.५ ग्रॅम वाल : रोग : भुरी नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर विद्राव्य गंधक ३ ग्रॅम चवळी : कीड : मावा, तुडतुडे आणि शेंगा पोखरणारी अळी नियंत्रण : फवारणी प्रति लिटर डायमेथोएट ः १.५ मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड ः ०.५ मि.लि. रोग : भुरी, पानावरील ठिपके फवारणी प्रतिलिटर विद्राव्य गंधक ३ ग्रॅम

    संपर्क : दर्शना भुजबळ, ०२४०,२३७६५५८ (कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com