agricultural news in marathi, potato crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

बटाटा पीक सल्ला
डॉ. एस. एम. घावडे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. वाढीच्या अवस्थेत बटाटा कंदांचे जमिनीत चांगले पोषण व्हावे, यासाठी खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करावे. काढणी करावयाच्या अवस्थेतही संपूर्ण झाड सुकल्यावरच काढणी करावी.

सद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. वाढीच्या अवस्थेत बटाटा कंदांचे जमिनीत चांगले पोषण व्हावे, यासाठी खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करावे. काढणी करावयाच्या अवस्थेतही संपूर्ण झाड सुकल्यावरच काढणी करावी.

बटाटा पीक कमी कालावधीत भरपूर उत्पादन देणारे अाहे. त्यामुळे त्याला पुरेशा प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा करणे आवश्‍यक ठरते. सद्यःस्थितीत लागवड करून दोन महिने झाले असल्यास नत्राची मात्रा ४० किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात द्यावी. त्याचबरोबरीने सूक्ष्म अन्नद्रव्यांची (ग्रेड २) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
वाढीच्या अवस्थेत ६-८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. विशेषत: जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होताना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी; अन्यथा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते.
काढणी
पाने सुकून जाईपर्यंत जमिनीत बटाटे पोसत असतात. त्यामुळे संपूर्ण झाड सुकल्यानंतरच काढणी करावी. लवकर काढलेले बटाटे साठवणुकीत टिकत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी केल्यास कमी खर्चात काढणी होते.
पीक तयार झाल्यावर २ ते ३ आठवडे पाणी देणे बंद करावे. काढणीनंतर बटाटा छोट्या ढिगात विभागून ७-८ दिवस शेतातच वाळू द्यावा, म्हणजे त्याची साल टणक होते.

संपर्क : डॉ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४
(मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

इतर कंद पिके
भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...
आरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...
कांदा-लसूण पीक सल्लासद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती...
बटाटा पीक सल्लासद्यःस्थितीत बटाटा पीक वाढीच्या व काढणीच्या...
रताळी लागवडीविषयी माहिती द्यावी. रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व...
शास्त्रीय पद्धतीने करा हळदीची काढणीसध्या हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. जातीपरत्वे...
फळपिकांमध्ये कंदपिकांची लागवडफळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य ...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
बिटपासून अारोग्यदायी जेलीबीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड...