क्षेत्रनिहाय जलसंधारण उपाययोजना

सलग समतल चर
सलग समतल चर

ओघळ नियंत्रण कामांबरोबरच पाणलोट क्षेत्रावर जलसंधारणाचे अभियांत्रिकी उपचार पाणलोट क्षेत्र विकासाच्या माथा ते पायथा या सूत्रानुसार अवलंबिणे गरजेचे आहे. त्यापैकी काही उपाययोजना खालीलप्रमाणे.

सलग समतल चर : पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी सलग समतल  चराचा वापर करतात.  यासाठी समपातळी रेषेवर ३० सें.मी. खोल व ६० सें.मी. रुंद असे सलग चर खोदावेत. या चरातून निघणारी माती चराच्या खालील बाजूस लावावी. त्यामुळे दोन चरांमधील पट्ट्यांमध्ये ओलावा दीर्घकाळ राहतो. या ओलाव्याचा फायदा गवताची वाढ चांगल्याप्रकारे होण्यास होतो. जागेची निवड :

  • शेतीसाठी अयोग्य क्षेत्र.
  • जमिनीची खोली ७.५ सें.मी. असावी. उथळ किंवा कमी खोलीच्या (७.५ सें.मी. पर्यंत) जमिनीवर सलग समतल चर घ्यावेत.
  • डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे :

    डोंगर व टेकड्यांच्या उतारावरील क्षेत्रामधील पाण्याची गती कमी करून व माती अडवून पाणी जमिनीत मुरविण्यासाठी याचा उपयोग होतो.

    जागेची निवड : हा उपचार पाणलोट क्षेत्रात करण्यासाठी ज्या ठिकाणी पुरेसे दगड उपलब्ध आहेत, अशा जागेची निवड करावी.

    संपर्क : अतुल अत्रे, ९८६०५९३८३६ (डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि. नगर )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com