फवारणीदरम्यान होणारी विषबाधा रोखण्यासाठी उपाययोजना
डॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. डी. बी. उंदिरवाडे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कीटकनाशके विषारी असून, त्यांचा वापर करताना अत्यंत सावधानता बाळगणे गरजेचे असते. सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान शेतकऱ्यांना विषबाधा होऊन जीवितहानी झाली. त्यामध्ये अन्य अनेक कारणे असली, तरी फवारणी करताना योग्य काळजी घेण्याची आवश्‍यकता त्यातून पुढे आली आहे.

कपाशी पिकामध्ये सध्या रसशोषक किडी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असून, त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी घेतली जात आहे. फवारणीच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याविषयी माहिती घेऊ.  

कीटकनाशके विषारी असून, त्यांचा वापर करताना अत्यंत सावधानता बाळगणे गरजेचे असते. सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान शेतकऱ्यांना विषबाधा होऊन जीवितहानी झाली. त्यामध्ये अन्य अनेक कारणे असली, तरी फवारणी करताना योग्य काळजी घेण्याची आवश्‍यकता त्यातून पुढे आली आहे.

कपाशी पिकामध्ये सध्या रसशोषक किडी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असून, त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी घेतली जात आहे. फवारणीच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याविषयी माहिती घेऊ.  

विषबाधा होण्याची कारणे :
सध्या पश्‍चिम विदर्भामध्ये दमट, उष्ण वातावरण व प्रखर ऊन आहे. बहुतांश ठिकाणी कपाशीची लागवड ओळीने केलेली असल्याने कपाशीची वाढ सर्वसाधारणपेक्षा १ ते १.५ फूट अधिक (४.५ ते ६ फुटांपर्यंत) झाली आहे. पिकामध्ये कॅनोपीची गर्दी झाल्याने हवा व सूर्यप्रकाश खेळता राहत नाही. पर्यायाने पिकामधील असे सूक्ष्म वातावरण रसशोषक किडी (प्रामुख्याने पांढरी माशी) व बोंडअळ्यांसाठी पोषक आहे.

 • दाटलेल्या कपाशीमध्ये चालणेही अवघड आहे, अशा स्थितीमध्ये फवारणीही अत्यंत अवघड होते. फवारणीवेळी चालण्याचा वेग कमी होतो.
 • प्रामुख्याने फवारणीचे द्रावण अंगावर, डोळ्यांत व श्‍वासाद्वारे नाकामध्ये जाते.
 • दाटलेल्या पिकात हवा खेळती नसल्यामुळे मोकळा श्‍वास घेता येत नाही.
 • उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये फवारणी करतेवेळी शरीर घामाने व कीटकनाशकांच्या द्रावणामुळे सतत ओलेचिंब राहते. परिणामी कीटकनाशकाची बाधा होऊ शकते.
 • अनेक ठिकाणी फवारणीचे काम ठेका पद्धतीने केले जाते. असा मजूर दिवसभर फवारणीचेच काम करतो. सतत कीटकनाशकांच्या संपर्कात राहितो.
 • फवारणीच्या योग्य पद्धतीचा अवलंब न करण्यामुळे (उदा. हवेच्या विरुद्ध दिशेने, प्रखर उन्हात फवारणी इ.) विषबाधेच्या शक्‍यतेत वाढ होते. फवारणी करताना तंबाखू खाणे, विडी ओढणे, हात न धुता पाणी पिणे अशा क्रिया सर्रास केल्या जातात. त्यामुळे कीटकनाशकांचे अंश सरळ पोटात जातात.
 • दाट वाढ झालेल्या कपाशीत फवारणी पंपाची दांडी सहज खालीवर फिरविता येत नाही. त्यामुळे शेतमजूर फवारा प्रामुख्याने कंबरेच्यावर व चेहऱ्याच्या पातळीवर करताना आढळून आले आहे. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्‍यता आहे.

कीडनाशकांची हाताळणी करताना...  :

 • पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. किडींनी आर्थिक नुकसानपातळी गाठल्यानंतरच उदा. कपाशीमध्ये सरासरी १० रसशोषक किडी प्रतिपान किंवा बोंडअळी नुकसानग्रस्त पात्या/ फुले/ बोंड यांचे प्रमाण ५ टक्के असे एकत्रित नुकसान असल्यास कीटकनाशकांचा वापर करावा.
 • तत्पूर्वी किडींचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वरील किडींसाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक प्रयत्न वाढवण्याची आवश्‍यकता आहे. पहिल्या टप्प्यातच रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडींचे नैसर्गिक शत्रू मारले जातात. परिणामी किडींचा उद्रेक होतो (उदा. पांढरी माशी), किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते,
 • फवारणी फक्त सकाळी किंवा संध्याकाळी करावी. कारण या वेळी हवेचा वेग कमी असल्याने द्रावण अंगावर उडत नाही.  
 • सतत फवारणी करणाऱ्या मजुरांनी सुरक्षा साधनांचा (उदा. कपडे, मास्क इ.)  योग्य वापर करावा. कीटकनाशकांचा संपर्क कटाक्षाने टाळावा. हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. सतत कीटकनाशकांच्या संपर्कात आल्याने त्वचेची ॲलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे इ. प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करावेत.
 • दाटलेल्या व उंच पिकात फवारणी करावयाची असल्यास शक्‍यतो एकेरी नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा. त्यामुळे फवारणीचा घेर कमी होऊन द्रावणाचे तुषार फवारणी करणाऱ्याच्या अंगावर पडत नाहीत.
 • फवारणी करताना घ्यावयाची काळजी
 • शिफारशीत कीटकनाशकांची नामांकित कंपनीकडूनच खरेदी करावी. सोबतचे लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे.
 • कीटकनाशके कुलूपबंद पेटीत व लहान मुलांपासून दूर ठेवावीत.
 • डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वांत विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात.
 • तणनाशके फवारणीचा पंप कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नयेत.
 • प्लॅस्टिक बादलीत पाणी घेऊन कीटकनाशकांची आवश्‍यक शिफारशीत मात्रा मोजून मिसळावी. काठीने चांगले ढवळून एकजीव मिश्रण तयार करावे. नंतर हे मिश्रण आवश्‍यक क्षेत्रासाठी पाण्यामध्ये मिसळून फवारणीचे द्रावण तयार करावे.
 • फवारणी पंपामधून सर्वसाधारण मध्यम आकाराचे (१०० ते ३०० मायक्रॉन) थेंब पडतात. मध्यम आकाराचे थेंब फवारणीसाठी योग्य आहे. यापेक्षा लहान आकाराचे थेंब फवारल्यानंतर पिकावर योग्य त्या ठिकाणी पडण्यापूर्वीच ते वाऱ्याने इतरत्र जातात, तर मोठ्या आकाराच्या थेंबामुळे विस्तृत फवारणी होत नाही. थेंब एकत्र येऊन पानावरून खाली घसरून पडतात. त्यामुळे पंपाचे नोझल योग्यप्रकारे फवारणी होईल असे ठेवावे.

संपर्क :  डॉ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
(विभागप्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
मेल ः ppsu.akl@gmail.com

इतर कृषी सल्ला
जनावरांतील जखमांवर वेळेवर उपचार...जनावरांना काही कारणास्तव जखमा होतात. या जखमांमुळे...
सुदृढ, निरोगी जनावरांसाठी व्यवस्थापनात...दुग्धव्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर जनावरांच्या...
मातीच्या पोतानुसार ओळखा जमिनीचा प्रकारगेल्या भागामध्ये जमिनीच्या एकूण १२ प्रकारांविषयी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
नियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...
केळी पीक सल्लासद्यस्थितीत राज्यात सर्वत्र कोरडे व उष्ण हवामान...
तुरीवरील शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रणकिडीचे सामाईक नाव ः घाटे अळी/ हिरवी अमेरिकन...
पौष्टिक, लुसलुशीत चाऱ्यासाठी पेरा ओटओट पिकाचा पाला हिरवागार, पौष्टिक व लुसलुशीत असतो...
अाजारापासून वाचवा निरोगी जनावरांनाजनावरांमध्ये विविध प्रकारचे जिवाणूजन्य,...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लासिंचन व्यवस्थापन : लिंबूवर्गीय फळबागेमध्ये ठिबक...
फवारणीदरम्यान होणारी विषबाधा...कीटकनाशके विषारी असून, त्यांचा वापर करताना अत्यंत...
राज्यात आठवडाभर पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील; तसेच...
रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरारब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण...
भातपिकावर तपकिरी तुडतुडे, लष्करी...मुसळधार पावसानंतर सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली...
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणसद्यःस्थितीत कपाशी पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत...
पावसाची शक्यता; डाउनी नियंत्रणाकडे लक्ष...सध्या कोणत्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची...
रब्बी भाजीपाला लागवड सल्ला१. मिरची जाती ः परभणी तेजस, ज्वाला, पंत सी...
सुधारित तंत्राने करा ब्रोकोली लागवडब्रोकोली या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी मध्यम...